Battlegrounds Mobile India खेळताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; एक चूक करू शकते पर्मनंट बॅन 

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 07:34 PM2021-06-21T19:34:39+5:302021-06-21T19:35:04+5:30

BGMI rules and regulations: बॅटलग्राउंड मोबाइलला इंडिया गेम खेळताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे न केल्यास गेम मधून कायमस्वरूपी बॅन होण्याची शक्यता आहे.

Play battlegrounds mobile india carefully permanent ban will happen on small mistake  | Battlegrounds Mobile India खेळताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; एक चूक करू शकते पर्मनंट बॅन 

Battlegrounds Mobile India खेळताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; एक चूक करू शकते पर्मनंट बॅन 

Next

बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) अर्थात पबजी मोबाईलचा बीटा व्हर्जन भारतीयांसाठी उपल्बध झाला आहे. गुरुवारी हा गेम उपलब्ध झाल्यानंतर फक्त दोन दिवसात 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे. सुरुवातीला मर्यादित लोकांसाठी उपलब्ध असलेला हा गेम आता सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. हा गेम अधिकृतपणे कधी लाँच होईल याची माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा गेम या महिन्याच्या शेवटपर्यंत लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Battlegrounds Mobile India खेळताना काही नियम पालन करणे आवश्यक आहे नाही तर तुमच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते.  

कंपनीच्या वेबसाइटवर या नियमांची माहिती देण्यात आली आहे. जर प्लेयर्सने काही नियम तोडले तर त्या प्लेयर्सना BGMI वर Permanent Ban केले जाईल. चला जाणून घेऊया पाच कारणे ज्यांच्यामुळे तुम्ही BGMI वर बॅन होऊ शकता.  

1) अनधिकृत प्रोग्राम किंवा हार्डवेयर डिवाइसचा वापर  

जर तुम्ही क्रॉफ्टनने परवानगी न दिलेल्या अनधिकृत प्रोग्राम किंवा हार्डवेयर डिवाइसचा वापर करत असाल तर तुम्हाला बॅनचा सामना करावा लागेल. यात माउस, कीबोर्ड अश्या हार्डवेयरचा समावेश होतो.  

2) गेम क्लायंट, सर्वर किंवा गेम डेटा मॉडिफाय करणे 

गेम क्लायंट, सर्वर किंवा डेटामध्ये अनधिकृत बदल केल्यास आणि कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन केल्यास, कंपनी तुम्हाला बॅन करू शकते.  

3) भेदभाव करणे  

गेम खेळताना जात, धर्म, लिंग, राष्ट्रीयत्व इत्यादींच्या आधारवर भेदभाव करता येणार नाही. जर तुम्ही असे केलेत आणि तुमच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली तर तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो.  

4) आक्षेपार्ह युजरनेमचा वापर करणे 

युजरनेम आक्षेपार्ह किंवा नकारात्मक असू शकतात. असे युजरनेम असल्यास कंपनी ते बदलू शकते आणि तुम्हाला दंड ठोठावू शकते.  

5) संघाला त्रास देणे  

गेम खेळताना तुमच्या मारणे ग्राह्य धरले जाणार नाही. जर तुम्ही जाणीवपूर्वक संघातील खेळाडूंना मारले किंवा त्रास दिला तर तुम्हाला बॅन करण्यात येईल.   

Web Title: Play battlegrounds mobile india carefully permanent ban will happen on small mistake 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.