शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच...विंडोज 10 मध्ये मातृभाषेत टाईप करा; इंडिक कीबोर्डचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 17:06 IST

मायक्रोसॉफ्टने नुकतीच १० भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड सादर केल्याची घोषणा केली.

मायक्रोसॉफ्टने त्यांची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 मध्ये भारतीय भाषा टाईप करण्यासाठी इंडिक कीबोर्डचा समावेश केला आहे. याव्दारे हिंदी, बंगाली, गुजराती अशा दहा भारतीय भाषांमध्ये टाईप करता येणार आहे. 

मायक्रोसॉफ्टने नुकतीच १० भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड सादर केल्याची घोषणा केली. हा व्हर्च्युअल कीबोर्डमध्ये युजरची व्यवहारपद्धती नोंद केली जाणार आहे. त्यानुसार युजर लॅटीन भाषेमध्ये त्याची स्थानिक भाषा टाईप करत असेल तर त्या शब्दाचे स्थानिक भाषेमध्ये रुपांतर होणार आहे. 

हा कीबोर्ड वापरल्यास अपेक्षित शब्द किंवा त्यानुसार सूचना मिळणार आहे. मोबाईलमध्ये गुगलचा कीबोर्डवर टाईप केल्यानंतर मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये जसे रुपांतर होते, तसेच रुपांतर या किबोर्डमध्ये होणार आहे. तसेच एखाद्या अनोळखी भाषेमध्ये लिहायचे असल्यासही हा कीबोर्ड त्या भाषेमध्ये भाषांतर करणार आहे. यामुळे ही भाषा स्वतंत्रपणे शिकण्याची आवश्यकता भासणार नाही. अद्ययावत फोनेटिक कीबोर्ड हिंदी, बंगाली, तमिळ, मराठी, पंजाबी, गुजराती, उडिया, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या कीबोर्डवरून भारतीय आता त्यांच्या मातृभाषेमध्ये काम करू शकतात. 

जर आपण लॅटिन अक्षरांमध्ये ‘Bharat’ टाईप केले तर फोनेटिक कीबोर्डचा अंतिम आउटपुट भारत (हिंदी), ভারত (बंगाली), ભારત (गुजराती) अथवा ਭਾਰਤ (पंजाबी) असणार आहे.

 

इंडिक फोनेटिक कीबोर्ड साठी काय कराल? विंडोज 10 (19एच1) च्या नवीन अपडेटमध्ये अद्ययावत कीबोर्ड स्वयंचलितपणे उपलब्ध आहेत. परंतु ज्या वापरकर्त्यांनी त्यांचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केले नाही ते साध्या स्टेप्समध्ये नवीन अपडेट मिळवू शकतात. Go to Settings> Updates & Security> Windows Update. अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर लँग्वेज सेटिंग्जमध्ये जाऊन फोनेटिक कीबोर्डस अॅक्टिव्हेट केले जाऊ शकतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान