Android Virus Alert: PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

By सिद्धेश जाधव | Published: November 22, 2021 01:31 PM2021-11-22T13:31:10+5:302021-11-22T13:32:24+5:30

Android Virus PhoneSpy: PhoneSpy नावाच्या नव्या धोकादायक Android Virus ची माहिती समोर आली आहे. हा Malware 23 अ‍ॅप्समध्ये आढळला आहे.  

Phonespy virus affected 23 android apps are stealing phones data how to stay safe   | Android Virus Alert: PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

Android Virus Alert: PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

Next

Google Play Store वर जोकर मालवेयरचा धुमाकूळ सुरु आहे. प्रत्येक महिन्याला एखादी यादी येते ज्यांच्यात हा व्हायरस आढळलेला असतो. आता नव्या स्पायवेयरची माहिती समोर आली आहे. अँड्रॉइडवर PhoneSpy नावाचा मालवेयर आढळला आहे. या मालवेयरने 23 अ‍ॅप्स ग्रासले गेले आहेत. हॅकर्स या इस मालवेयरच्या माध्यमातून युजरच्या स्मार्टफोनवर पाळत ठेवत आहेत आणि खाजगी माहिती चोरत आहेत.  

PhoneSpy Virus कसे काम करतो? 

PhoneSpy मालवेयर युजरच्या स्मार्टफोनमधील महत्वाचा डेटा चोरण्याचं काम करतो. ज्यात मेसेज, कॉल आणि डिवाइस लोकेशन इत्यादी माहितीचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर 23 अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोनचा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस एनेबल करून ऑडियो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून डेटा ट्रांसफर करतो. तसेच या धोकादायक मालवेयरपासून डिवाइसचा IMEI नंबर, मॉडेल नंबर आणि ब्रँडची माहिती देखील लपून राहत नाही.  

Zimperium या मोबाईल सिक्युरिटी एजन्सीने रिपोर्टमधून हा मालवेयर असलेले अ‍ॅप्स अनइंस्टॉल करू शकतो, असे सांगितले आहे. यात सिक्योरिटी अ‍ॅप्सचा देखील समावेश असतो. त्यामुळे स्मार्टफोनची सुरक्षा कमी होते. हा मालवेयर डिवाइसचे अचूक लोकेशन रियल-टाइममध्ये ट्रान्सफर करतो. तसे हे 23 अ‍ॅप्स Facebook, Instagram, Twitter, Google आणि Kakao Talk या सोशल मीडिया अ‍ॅप्सचा देखील वापर करतात.  

क्या काळजी घ्यावी? 

फोनस्पाय मालवेयर असलेले हे अ‍ॅप्स अमेरीकेत आणि कोरियात आढळले आहेत. विशेष म्हणजे हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाहेरून थर्ड पार्टी अ‍ॅप्स करताना काळजी घ्यावी. इंस्टाल करताना ते अ‍ॅप गुगल प्ले स्टोरद्वारे वेरिफाइड आहेत कि नाही ते चेक करा. SMS किंवा ई-मेलच्या माध्यमातून आलेल्या लिंक किंवा फाईलद्वारे अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नका.  

Web Title: Phonespy virus affected 23 android apps are stealing phones data how to stay safe  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.