शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

सिंगल चार्जवर तीन महिने चालणार हा फोन! फक्त 7,499 रुपयांमध्ये मिळतेय 6GB RAM ची ताकद 

By सिद्धेश जाधव | Updated: February 21, 2022 14:55 IST

Tecno Spark 8C स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh Battery आणि 13MP Camera सह लाँच झाला आहे. कंपनीनं याची किंमत 8 हजारांच्या आत ठेवली आहे.

Tecno नं यावर्षीची दणक्यात सुरुवात केली आहे. कंपनीनं भारतात Tecno Pop 5 LTE, Tecno Pop 5 Pro आणि Tecno Pova Neo असे तीन फोन सादर केले आहेत. यात आता बजेट फ्रेंडली Tecno Spark 8C ची भर टाकण्यात आली आहे. टेक्नो स्पार्क 8सी देशात फक्त 7,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. एवढ्या कमी किंमतीत देखील कंपनीनं 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh Battery आणि 13MP Camera दिला आहे.  

Tecno Spark 8C 

Tecno Spark 8C स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह UNISOC T606 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीनं यातील 3 जीबी रॅमसह 3 जीबी मेमरी फ्यूजन फीचर दिलं आहे. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 6 जीबी रॅम वापरता येतो. सोबत असलेली 64 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256 जीबी पर्यंत वाढवता येते. 

या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 8सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय सेन्सर मिळतो. फ्रंट पॅनलवर फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.  

ड्युअल सिम Tecno Spark 8C मध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. तसेच फिंगरप्रिंट सेन्सरच्या सुरक्षेसह फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आलं आहे. यातील IPX2 रेटिंग या फोनला पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. तसेच पावर बॅकअपसाठी या टेक्नो मोबाईल 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 89 दिवसांचा स्टँडबाय टाइम देईल, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Tecno Spark 8C ची किंमत 

Tecno Spark 8C चा एकमेव 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियावरून Magnet Black, Iris Purple, Diamond Grey आणि Turquoise Cyan कलरमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान