शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Paytm चे शानदार फीचर! तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? आता कुठे पोहोचली?... हे लगेच समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:34 IST

Paytm : कोणीही आता पेटीएम अॅपचा (Paytm App) वापर थेट ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीचा मागोवा (PNR Status tracking) घेण्यासाठी करू शकतो.

नवी दिल्ली : पेटीएम (Paytm) अनेक नवीन फीचर्स आणत आहे, त्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्मवरील सुविधा वाढवत आहेत. ट्रेन प्रवाशांसाठी पेटीएम ट्रेन तिकीट बुक करण्याची क्षमता प्रदान करते आणि आता कंपनीने संबंधित सुविधांचा विस्तार केला आहे. पेटीएमवर प्रवासी आता आपल्या प्रवासाचे PNR स्टेटस ट्रॅक  (Paytm Live Train Status) करू शकतील. याव्यतिरिक्त, कोणीही आता पेटीएम अॅपचा (Paytm App) वापर थेट ट्रेनच्या धावण्याच्या स्थितीचा मागोवा (PNR Status tracking) घेण्यासाठी करू शकतो. यामुळे आता प्रवाशांना वेबसाइटवर अवलंबून राहणे टाळता येऊ शकेल.

युजर्सना अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पेटीएम अॅप (Paytm App) लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल. एकदा अपडेट केल्यानंतर तुम्ही लिस्टेड या सुविधा शोधण्यासाठी लिस्टमधून स्क्रोल करू शकता. मात्र, सुविधा शोधण्यासाठी अॅपमधील सर्च फंक्शन वापरणे हा सोपा मार्ग आहे; पेटीएम अॅपमध्ये (Paytm App) अनेक सुविधा लिस्टेड आहेत.

Paytm Live Train Status, PNR Status tracking ची घोषणाज्या लोकांना थेट ट्रेनची स्थिती ट्रॅक करण्यात स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी प्रक्रिया सोपी आहे -- पेटीएम अॅपवर जा आणि ट्रेनचे स्टेटस शोधा.- पेटीएम ट्रॅव्हल सेक्शन ओपन होईल, ज्याद्वारे तुम्ही ट्रेन, बस, फ्लाइट इत्यादी ट्रॅक करू शकता.- तुम्हाला 'ट्रेन' ऑप्शन निवडावा लागेल. येथे तुम्हाला PNR स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, ट्रेन कॅलेंडर आणि ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा ऑप्शन मिळेल.- तुम्ही ट्रेन नंबर इनपुट करू शकता आणि सर्च फंक्शनवर टॅप करू शकता.- एकदा तुम्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, अॅप येणारे स्टेशन, शेवटचे स्टेशन, जवळचे स्टेशन, प्रवासासाठी शिल्लक वेळ, प्लॅटफॉर्म डिटेल्स, आगमन आणि प्रस्थान वेळ आणि अपेक्षित आगमन वेळ यासह सर्व प्रवासाची माहिती दाखवेल.- त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगची स्थिती तपासण्यासाठी तुमचा पीएनआर नंबर इनपुट करू शकता.- तुम्ही ट्रेन कॅलेंडर देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही एका आठवड्यात धावणाऱ्या रेल्वेचे दिवस आणि सर्व वर्गातील जागांची उपलब्धता पाहण्यास सक्षम असाल.

Paytm च्या अनेक सुविधापेटीएमचे म्हणणे आहे की, कोणीही हिंदी, बांगला, तेलुगु, मराठी, तमिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, ओडिया आणि बरेच काही अशा 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये बुक करू शकतो. कंपनी म्हणते की कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा छुपे खर्च करावा लागत नाही. तसेच, ग्राहक ज्येष्ठ नागरिक कोट्याचा लाभ घेऊ शकतात, म्हणजे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष प्रवासी आणि 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला प्रवासी लोअर बर्थ तिकीट बुक करू शकतात. सर्व पेमेंट यूपीआयद्वारे सुरू केले जातील आणि ते शून्य पेमेंट गेटवे (PG) शुल्कासह येतात.

टॅग्स :Paytmपे-टीएमIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेtechnologyतंत्रज्ञानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स