शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अलर्ट! 'हे' पेमेंट अ‍ॅप होतंय बंद, लवकरच तुमचे पैसे काढून घ्या अन् अकाऊंट करा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 08:29 IST

Payment App : देशातील एका डिजिटल पेमेंट अ‍ॅपने भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंट अ‍ॅप्समध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. नोटबंदीनंतर लोकांनी कॅश नसल्याने विविध अ‍ॅप्सच्या मदतीने सर्वात जास्त पेमेंट केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे. आता देशात डिजिटल पेमेंट युजर्स वाढत आहे. देशातील मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. मात्र आता देशातील एका डिजिटल पेमेंट अ‍ॅपने भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही जर या अ‍ॅपचा वापर करत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या आणि आपलं अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह करा. 

मीडिया सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, PayPal हे डिजिटल पेमेंट अ‍ॅप देशातून बंद करण्यात येणार आहे. आता या अ‍ॅपची सेवा 1 एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे. जर तुम्ही पे पलचा वापर करत असाल तर आपल्या अकाऊंटला डिअ‍ॅक्टिव्ह करू शकता. जर आपण अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. 

- सर्वात आधी PayPal च्या वेबसाईटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. 

- सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाऊंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका. 

- नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाऊंटवर क्लिक करा. 

- जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाऊंट बंद करू शकता.

PayPal जगभरात जवळपास 190 देशात आपली सर्व्हिस देते. या देशात जवळपास 100 मिलियन अकाऊंट मेंबर आहेत. भारतात PayPal ने 2017 मध्ये आपली सेवा सुरू केली होती. डिजिटल पेमेंट ही एक वेबसाईट आहे. ज्यावरून ऑनलाईन पेमेंट केलं जातं. तर याच्या मदतीने अनेक युजर्सं आंतरराष्ट्रीय लेवलवर ट्रान्झॅक्शन करू शकतात. PayPal च्या मदतीने युजर्स एका देशातून दुसऱ्या देशात अत्यंत सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अलर्ट! QR कोड स्कॅन करून पेमेंट करताय?, वेळीच व्हा सावध नाहीतर...; अशी घ्या काळजी

ऑनलाईन व्यवहार करण्याकडे हल्ली सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. एखाद्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर QR कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे. दुकानदारला ऑनलाईन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर हमखास केला जातो. मात्र यामुळे फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आलं होतं. आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कसा धोका आहे याबाबत जाणून घेऊया.

ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल देवाण घेवाण करत असतानाच फ्रॉडचे प्रमाण हे सर्वाधिक असते. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. फ्रॉडस्टर त्यावेळी याचा गैरफायदा घेत असतात. क्यूआर कोडला बदल करतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टरच्या अकाऊंटला जातं. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केलं जातं. त्यामुळे पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता थेट फ्रॉडस्टरच्या अकाऊंटमध्ये जातं. क्यूआर कोड फिशिंगची वेगवेगळी पद्धत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलMONEYपैसा