शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सुपर ऑफर, फक्त 199 रुपयांत 'ही' कंपनी देतेय अनलिमिटेड इंटरनेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:13 IST

Unlimited Data Plan : ऑर्टेल (Ortel) नावाच्या कंपनीने 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली : सध्या देशात एअरटेल, बीएसएनएल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या कंपन्या इंटरनेट सेवा पुरवत आहेत, पण याशिवाय इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्या कमी खर्चात ब्रॉडबँड इंटरनेट (Broadband Internet) सेवा पुरवत आहेत. दरम्यान, सध्याचा काळ पाहता देशातील इंटरनेट स्वस्त होताना दिसून येत आहे. तुमच्यापैकी बरेच जण सध्या वर्क फ्रॉम होम करत असतील. (Ortel Broadband Offers Unlimited Data Plan For Rs 199)

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इंटरनेट खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्यापैकी बरेच लोक हे स्वस्त इंटरनेटचा प्लॅन शोधत असतील. अशा लोकांसाठी एक खास प्लॅन आला आहे. आता 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. ऑर्टेल (Ortel) नावाच्या कंपनीने 199 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. 

Ortel ही एक प्रादेशिक ब्रॉडबँड कंपनी आहे, जी सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा येथे आपली सेवा देत आहे. Ortel कडे सध्या असे दोन ब्रॉडबँड प्लॅन आहेत, ज्यांची बरीच चर्चा होत आहे. यातील सर्वात खास म्हणजे 199 रुपयांचा प्लॅन आहे.

199 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये काय आहे?Ortel च्या 199 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनला कंपनीने भुवनेश्वरमध्ये “Ortel Prime” असे नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये दैनंदिन वापराची मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही दररोज हवा तेवढा डेटा वापरू शकता. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 5Mbps ची डाऊनलोडिंग स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये अपलोड स्पीड फक्त 1Mbps आहे.

399 रुपयांच्या प्लॅनमधील फायदेOrtelच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 10Mbps स्पीड मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 449 रुपये खर्च केले तर तुम्हाला 30Mbps स्पीड मिळेल. जिओ फायबर देखील या किंमतीत समान स्पीड देते, मात्र जर तुम्हाला जास्त स्पीडची गरज नसेल तर 199 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान