शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 19:47 IST

चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.  

ठळक मुद्देOppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणारस्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाहीOppo A83 स्मार्टफोन दोन कलरमध्ये मार्केटमध्ये

मुंबई : चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.  Oppo A83 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने चीनमध्ये लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन फेस अनलॉक फिचरसोबत मार्केटमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे समजते. मात्र, मीडियाने दिलेल्या माहितीनुसार , Oppo A83 स्मार्टफोनची किंमत 13,990 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आल्यास Xiaomi Mi A1, Honor 7X आणि Samsung Galaxy On Max या स्मार्टफोनशी टक्कक देईल असे बोलले जात आहे. चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर Oppo A83 स्मार्टफोन दोन कलरमध्ये मार्केटमध्ये आला होता. यामध्ये ब्लॅक आणि शॅम्पेन कलरचा आहे. त्यामुळे भारतात सुद्धा लॉन्च होताना हे दोन्ही कलर कंपनी आणेल अशी आशा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर, या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि विशेष करुन रॅमध्ये फरक असण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या, काय आहेत Oppo A83 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स?-  ड्युअल सिम स्मार्टफोन- ऑपरेटिंग सिस्टिम अॅन्ड्राईड 7.1 नॉगट बेस्ड Color OS 3.2 - 4 जीबी रॅम-  2.5GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर- 5.7 इंचाचा एचडी आणि एलसीडी डिस्प्ले- 13 मेगापिक्सल एलईडी रिअर कॅमेरा - 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा- इंटरनल मेमरी 16 जीबी- याशिवाय, 4G, Wi-Fi 802.11 /b/g/n, GPS, मायक्रो -USB, Bluetooth 4.2, 3.5mm हेडफोन जॅक आणि  Wi-Fi डायरेक्ट देण्यात आले आहे.  

ओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण...गेल्या काही दिवसांपूर्वी ओप्पो ए७५ व ए७५एस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉंच करण्यात आले होते. ओप्पो ए७५ व ए७५एस या दोन्ही मॉडेल्समध्ये स्टोअरेजच्या क्षमतेचा अपवाद वगळता अन्य सर्व फिचर्स समान आहेत. ओप्पो ए७५ या मॉडेलमध्ये  ६ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (१०८० बाय २१६० पिक्सल्स) क्षमतेचा आणि एलसीडी या प्रकारचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक हेलिओ पी२३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर ओप्पो ए७५एस मॉडेलची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असेल. या दोन्ही व्हेरियंटचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २० मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये ३,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ओएस ३.२ या प्रणालीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलoppoओप्पो