शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno 6Z स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

By सिद्धेश जाधव | Published: July 19, 2021 6:48 PM

Oppo Reno 6Z Launch: OPPO Reno 6Z स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे.

गेल्या आठवड्यात OPPO ने आपल्या Reno 6 सीरीजमध्ये OPPO Reno 6 आणि OPPO Reno 6 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले केले आहेत. आता कंपनीने या सीरिजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन OPPO Reno 6Z लाँच केला आहे. ओप्पोने हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच केला आहे. OPPO Reno 6Z स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.  

OPPO Reno 6Z स्पेसिफिकेशन्स आणि फीचर 

OPPO Reno 6Z स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हा फोन स्मार्टफोन Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो. या ओप्पो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 800U चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनचा रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो.  

OPPO Reno 6Z स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. OPPO Reno 6Z स्मार्टफोन 4,310mAh बॅटरी 30W VOOC 4.0 चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

OPPO Reno 6Z ची किंमत 

OPPO Reno 6Z स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती अजूनतरी देण्यात आली नाही. हा स्मार्टफोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला गेला आहे. OPPO Reno 6Z स्मार्टफोनची किंमत 21 जूनला सांगण्यात येईल. हा स्मार्टफोन स्टेलर ब्लॅक आणि अरोरा या दोन रंगात सादर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड