शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

13GB RAM, स्नॅपड्रॅगॉन चिपसेटसह OPPO A95 4G झाला लाँच; किंमत-फीचर्स एकदा पाहाच 

By सिद्धेश जाधव | Updated: November 17, 2021 12:43 IST

Oppo A95 4G Price And Details: Oppo A95 4G मलेशियात 8GB RAM, Snapdragon 662 chipset आणि 5,000mAh battery सह सादर करण्यात आला आहे.

Oppo A95 4G Price: काही महिन्यांपूर्वी चिनी स्मार्टफोन कंपनी OPPO ने आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये Oppo A95 5G Phone सादर केला होता. आता या फोनचा 4G व्हर्जन बाजारात आला आहे. सध्या नवीन Oppo A95 4G मलेशियात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM, Snapdragon 662 chipset आणि 5,000mAh battery असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

OPPO A95 4G चे स्पेसिफिकेशन्स 

OPPO A95 4G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो. डिवाइसमधील 8GB RAM ला 5GB अतिरिक्त रॅमची जोड देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 सह कलरओएस 11.1 वर चालतो. 

बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन असलेल्या या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ओप्पो ए95 4जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

OPPO A95 4G ची किंमत 

ओप्पो ए95 4जी चे एकमेव व्हेरिएंट मलेशियात 1,099 मलेशियन रिंगीट अर्थात 19,500 भारतीय रुपयांच्या आसपास उपलब्ध झाला आहे. हा फोन Rainbow Silver आणि Starry Black कलरमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान