शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

OnePlus Nord N200 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आले समोर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: June 15, 2021 19:06 IST

Oneplus Nord N200 Specs: OnePlus Nord N200 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा असेल, त्याचबरोबर 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP ची मोनोक्रोम लेंस मिळेल.

OnePlus Nord N200 5G स्मार्टफोनच्या लाँचच्या बातमीला कंपनीने दुजोरा दिला आहे. वनप्लसचा हा स्मार्टफोन लवकरच अमेरिका आणि कॅनडामध्ये सादर केला जाऊ शकतो. वनप्लसचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह येईल, हा फोन गेल्यावर्षीच्या OnePlus Nord N100 चा उत्तराधिकारी असेल. आता पॉपुलर लीकस्टर इवान ब्लासने ट्विटरवर या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी काही रेंडर शेयर केले आहेत, त्यामुळे या फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.  (Oneplus Nord N200 Specs leaked by evan blass)

OnePlus Nord N200 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लीकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord N200 मध्ये 6.49 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 5G SoC सह Adreno 619 GPU, 4GB RAM आणि 64GB UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला जाईल. हा फोन Android 11 वर आधारित OxygenOS कस्टम स्किनसह 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. 

OnePlus Nord N200 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा असेल, त्याचबरोबर 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP ची मोनोक्रोम लेंस मिळेल. वनप्लसच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. 

OnePlus Nord N200 ची डिजाइन 

OnePlus Nord N200 मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात येईल. तसेच फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. मागे वनप्लसची ब्रँडिंग देखील असेल. फोनमध्ये उजवीकडे फिंगरप्रिंट सेन्सर एम्बडेडपावर बटण असेल. तर डावीकडे वॉल्यूम बटण दिले जाऊ शकतात.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोन