शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

12GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेला OnePlus Nord CE 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या ऑफर्स  

By सिद्धेश जाधव | Updated: June 16, 2021 11:34 IST

OnePlus Nord CE 5G Sale: OnePlus Nord CE 5G 16 जून, दुपारी 12 वाजल्यापासून अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.

OnePlus Nord CE 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स साईट अमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल. जर तुम्ही हा फोन विकत घेण्यास घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन हा फोन खरेदी करू शकता. (OnePlus Nord CE 5G will be available on Amazon and OnePlus website from 16 Jun) 

किंमत आणि ऑफर्स  

या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपयांपासून सुरु होते, हि किंमत फोनच्या 6GB रॅम आणि 128GB मॉडेलची आहे, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. या फोनचा सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 27,999 रुपये आहे. 

या फोनची खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांचा डिस्कॉउंट मिळू शकतो. अमेझॉनकडून या फोनच्या खरेदीवर 6,000 रुपयांचे फायदे रिलायन्स जियो ग्राहकांना देण्यात येत आहेत. तसेच, अमेझॉन पे वापरणाऱ्या ग्राहकांना 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक दिला जाईल.  

OnePlus Nord CE 5G चे स्पेसिफिकेशन्स  

वनप्लस नॉर्ड सीई 5जी स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा फुल-एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच, डिस्प्लेमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या नवीन नॉर्ड फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750जी 5G चिपसेट आणि Adreno 619 GPU दिला आहे.  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 5G मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात, 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मोनो लेंस सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. नॉर्ड सीई 5जी मध्ये 4,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन