शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेडमीचा बाजार उठवण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात; OnePlus नं उचलला विडा  

By सिद्धेश जाधव | Updated: April 11, 2022 19:44 IST

ओप्पो, विवो, रियलमी, सॅमसंग आणि अन्य काही छोट्या ब्रँड्सकडून रेडमीला चांगलीच टक्कर मिळते. परंतु आता त्यात आता फ्लॅगशिप किलर आणि दमदार स्मार्टफोन सादर करणाऱ्या OnePlus ची भर पडणार आहे.

शाओमी आपले स्वस्त स्मार्टफोन रेडमी ब्रँड अंतर्गत सादर करते. या ब्रँडला ओप्पो, विवो, रियलमी, सॅमसंग आणि अन्य काही छोट्या ब्रँड्सकडून चांगलीच टक्कर मिळते. परंतु आता त्यात आता फ्लॅगशिप किलर आणि दमदार स्मार्टफोन सादर करणाऱ्या OnePlus ची भर पडणार आहे. एकेकाळी फक्त प्रीमियम आणि निवडक स्मार्टफोन सादर करणारी कंपनी आता बजेट सेगमेंटमध्ये देखील उतरणार आहे.  

भारतीय बाजारात विस्तार करण्याच्या योजने अंतर्गत वनप्लस लोवर मिडबजेटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता OnePlus कंपनी येत्या 28 एप्रिलला भारतात OnePlus Nord CE 2 Lite 5G नावाचा नवीन फोन सादर करू शकते. कंपनीच्या आगामी इव्हेंटमधून येणाऱ्या डिवाइसची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेरीस स्वस्त OnePlus Nord CE 2 Lite 5G फोन आणि OnePlus Nord Buds भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात.  

OnePlus Nord CE 2 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन  

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 6.59-इंचाच्या फुल एचडी+ एलसीडी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेटचा वापर केला जाईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. यात अँड्रॉइड आधारित ऑक्सिजन ओएस मिळू शकतो. 

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो सेन्सर असेल. डिवाइसच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर असेल. हँडसेट मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. 

 
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन