शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: February 18, 2022 12:04 IST

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G मध्ये 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh Battery असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत.

OnePlus नं काल भारतात आपला OnePlus Nord CE 2 5G नावाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं यात 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh Battery असे दमदार स्पेक्स दिले आहेत. हा फोन मिडबजेट सेग्मेंटमध्ये शाओमी, रियलमी आणि मोटोरोलाला चांगलीच टक्कर देऊ शकतो.  

OnePlus Nord CE 2 चे स्पेसिफिकेशन्स 

वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजनओएस 11 मिळतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेट एआरएम माली-जी68 एमसी4 जीपीयूसह दिला आहे. सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या वनप्लसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

OnePlus Nord CE 2 ची किंमत 

फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी 24,999 रुपये मोजावे लागतील. वनप्लस नॉर्ड सीई 2 येत्या 22 फेब्रुवारीपासून Gray Mirror आणि Bahama Blue कलरमध्ये विकत घेता येईल. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान