खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: November 9, 2021 11:54 AM2021-11-09T11:54:56+5:302021-11-09T11:55:06+5:30

OnePlus Nord 2 PAC-MAN Edition Price In India: वनप्लस दरवर्षी आपल्या मोबाईलचे खास एडिशन सादर करत असते. यावर्षी OnePlus Nord 2 PAC-MAN Edition सादर करण्याची तयारी कंपनी करत आहे. हा फोन Amazon India वर लिस्ट देखील झाला आहे.

Oneplus nord 2 pac man edition smartphone will be launched soon  | खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट 

खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट 

googlenewsNext

वनप्लस मोबाईल कंपनी यावर्षी आलेल्या OnePlus Nord 2 चा खास एडिशन घेऊन येत आहे. कंपनी दरवर्षी आपल्या स्मार्टफोनचे स्पेशल एडिशन घेऊन येते. आता कंपनी OnePlus Nord 2 PAC-MAN Edition लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर देखील लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या खास फोनची किंमत समजली आहे.  

OnePlus Nord 2 PAC-MAN Edition ची किंमत 

OnePlus Nord 2 PAC-MAN Edition भारतात 37,999 रुपयांमध्ये सादर केला जाईल. अ‍ॅमेझॉन इंडियावर हा फोन या किंमतीत लिस्ट झाला आहे. ही किंमत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची असेल, अँड्रॉइड अथॉरीटीने सांगितले आहे.  

OnePlus Nord 2 PAC-MAN Edition  

या नव्या एडिशनमध्ये हार्डवेअर जास्त बदलणार नाही, परंतु सॉफ्टवेअर गेमिंग सेंट्रिक असेल. OnePlus Nord 2 x PAC-MAN Edition मधील आयकॉन देखील पॅकमॅन गेमवर आधारित असतील. त्याला थीमवर आधारित वॉलपेपर, अ‍ॅनीमेशन आणि कॅमेरा फिल्टरची जोड देण्यात येईल. तसेच यात PAC-MAN 256 गेम प्री-इंस्टॉल देण्यात येतील.  

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो.  

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.   

Web Title: Oneplus nord 2 pac man edition smartphone will be launched soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.