शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचा लूक झाला लीक; 50MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OnePlus Nord 2  

By सिद्धेश जाधव | Updated: June 29, 2021 13:04 IST

OnePlus Nord 2 Specs: OnePlus Nord 2 चे रेंडर्स लीक झाले आहेत, या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.  

प्रीमियम स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी वनप्लस लवकरच मिड रेंजमध्ये OnePlus Nord 2 लाँच करणार आहे. आता या आगामी स्मार्टफोनचे रेंडर्स ऑनलाईन लीक झाले आहेत. या लीकमधून समजले आहे कि या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. प्रसिद्ध टिप्सटर @OnLeaks आणि 91mobiles यांनी मिळून हे रेंडर्स सोमवारी शेयर केले आहेत.  

OnLeaks आणि 91Mobiles यांनी शेयर केलेल्या रेंडर्समध्ये समजले आहे कि फोनमध्ये होल पंच डिस्प्ले असेल. या डिस्प्लेच्या फ्रंटला डावीकडे हा पंचहोल देण्यात येईल. या फोन मध्ये स्लिम बेजल्स असतील तसेच चीन पार्ट देखील स्लिम दिसत आहे. फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर आणि उजवीकडे पावर बटण आणि अलर्ट स्लाईडर देण्यात येईल. 

OnePlus Nord 2 च्या लीक रेंडर्सनुसार, फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. हा आयताकृती कॅमेरा मॉड्यूल डाव्या बाजूला असेल. फोनच्या तळाला एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि बॉटमला एक स्पिकर ग्रिल आहे.  

OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये  MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.   

OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान