शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर, जाणून घ्या किंमत

By हेमंत बावकर | Updated: October 15, 2020 09:13 IST

OnePlus 8T launch: OnePlus 8T हा फोन वनप्लसचा पहिलाच 65 वॉट व्रॅप चार्ज तंत्रज्ञानाचा आहे.

Apple ने आयफोन 12 ची सिरीज लाँच केल्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनची प्रिमिअम स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने OnePlus 8T स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आता वनप्लसकडेही नव्या 5जी तंत्रज्ञानाचे तीन स्मार्टफोन झाले आहेत. 

OnePlus 8T हा फोन वनप्लसचा पहिलाच 65 वॉट व्रॅप चार्ज तंत्रज्ञानाचा आहे. हा फोन  8जीबी+128जीबी आणि +256जीबी या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापैकी 8 जीबी व्हेरिअंटची किंमत 42999 आणि 12 जीबीची किंमत 45999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा सेल 17 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. 

वनप्लस 8T मध्ये 1080x2400 पिक्सल रिझोलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह फुल 6.55 इंचाचा एचडी प्लस फ्लॅट फ्लूइड डिस्प्ले देण्यात आला आहे. वनप्लसच्या या नव्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट देण्यात आला आहे. गेमिंगसाठी फोनमध्ये आधीच 285 टक्के मोठा वेपर चेंबर देण्यात आला आहे. 

कॅमेराफोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 16 एमपीचा अल्ट्रावाईड अँगल लेंस, एक 5 एमपीचा मायक्रो सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. गरज असेल तर नाईटस्केप मोड वापरता येणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

 अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

अँड्रॉईड 11 आऊट ऑफ दी बॉक्स देण्यात आली असून वनप्लसची त्यावर आधारित Oxygen OS 11 दिली आहे. यामध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिटमोजी, लाइव वॉलपेपर ग्रुप जेन मोड सारखे फिचर देण्यात आले आहेत. बिटमोजीसाठी स्नॅपचॅटसोबत करार केला आहे. 

बॅटरी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली असून 65 वॉट व्रॅप चार्जमुळे 15 मिनिटांत संपूर्ण दिवसभर फोन सुरु ठेवण्यासाठी चार्जिंग होणार आहे. फोनचे वजन 188 ग्रॅम आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलApple Incअॅपल