जयदीप दाभोळकरवनप्लसने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोनस्मार्टफोन भारतात लाँच केला. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या क्लाऊड 11 मध्ये OnePlus 11 अधिकृतरित्या सादर केला आहे. Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर येणारा हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
Samsung Galaxy S22 सीरीजची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते. तर दुसरीकडे iQOO 11 ची किंमत 59,999 रुपये आहे. वनप्लसने आपल्या या नव्या फ्लॅगशिप फोनच्या किंमतीचा खुलासा केला असून ती या दोन्ही स्मार्टफोनपेक्षा कमी ठेवण्यात आलीये. यासह कंपनीनं आपला OnePlus 11R देखील लाँच केलाय. OnePlus 11 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत कमी आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन?वन प्लस 11 मध्ये 6.7-इंचाचा 2K सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. हा 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या शिवाय या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलाय. वन प्लस 11 मध्ये 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रीमिअम फीचर्ससह येणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 बेस्ड ऑक्सिजन ओएस 13 वर काम करतो.
किती आहे किंमत?OnePlus च्या या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB व्हेरिअंटची किंमत 56,999 रुपये निश्चित करण्यात आलीये. तर त्याचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये आहे. ॲमेझॉन आणि वन प्लसच्या वेबसाईटवर जाऊन हे स्मार्टफोन खरेदी करता येतील.
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स?OnePlus 11R आणि OnePlus 11 5G यांच्या लूकमध्ये फारसा फरक नाही. वन प्लस 11 आरमध्ये यामध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय कंपनीनं 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्येही 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
OnePlus Pad लाँचवनप्लसने अखेर आपला पहिला टॅबलेट वनप्लस पॅड लाँच केला आहे. वनप्लस पॅड 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. एप्रिल महिन्यापासून याच्या प्रीऑर्डरला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली. भारताशिवाय हा टॅब नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्येही उपलब्ध होणार आहे. सध्या कंपनीने याची किंमत जाहीर केले नाही. OnePlus च्या नवीन टॅबमध्ये 11.61-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. टॅबमध्ये बिल्ट इन ट्रॅकपॅडसह एक डिटॅच होणारा फोलिओ देण्यात आलाय. या इव्हेंटमध्ये OnePlus ने आपल्या पहिल्या टॅबलेट व्यतिरिक्त OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G, OnePlus Buds Pro, वन प्लस टीव्ही आणि वन प्लस कीबोर्डसारख्या उत्पादनांची घोषणा केली.