शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

व्हाटसअ‍ॅपवर आता कोणत्याही प्रकारच्या फाईल करा शेअर  

By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:30 IST

व्हाटसअ‍ॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून आधी बीटा आवृत्तीसाठी असणारे हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून आधी बीटा आवृत्तीसाठी असणारे हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर सध्या कुणीही युजर सीएसव्ही, डॉक, डॉक्स, पीडीएफ, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी, एक्सएलएस, एक्सएलएसएक्स, एमपी ४, एव्हीआय तसेच जीआयएफ अ‍ॅनिमेशन फाईल्स वापरू शकतो. काही थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या (उदा. डब्ल्यूएफएस) मदतीने मर्यादीत प्रमाणात अन्य प्रकारच्या फाईल्स पाठविता येतात. आता मात्र कोणत्याही फॉर्मेटमधील फाईल व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करता येईल. मात्र यासाठी आयओएसवर १२४, अँड्रॉइडवर १०० तर व्हाटसअ‍ॅप वेबवर ६४ मेगाबाईटपर्यंतच्या फाईल्सच फक्त शेअर करता येणार आहेत. आधी हे फिचर फक्त अँड्रॉइडची बाटी आवृत्ती वापरणार्‍यांना देण्यात आले होते. आता मात्र अँड्रॉइड व आयओएस युजर्सला ही सुविधा मिळाली आहे.

व्हाटसअ‍ॅपने याशिवाय आता एकापेक्षा जास्त प्रतिमा वा व्हिडीओ हे अल्बमच्या स्वरूपात वैयक्तीक चॅट अथवा ग्रुपमध्ये शेअर करण्याची सुविधा दिली आहे. याआधी कुणीही युजर एकावेळी एकच इमेज अथवा व्हिडीओ शेअर करू शकत होता. मात्र आता अल्बमच्या स्वरूपातील मल्टी-शेअरिंगचे फिचर देण्यात आल्यामुळे ते अधिक आकर्षक आणि एकत्रीतपणे शेअर करता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे व्हाटसअ‍ॅपच्या नेव्हिगेशनमध्ये असणार्‍या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून आपण आपल्या अ‍ॅपमधील सर्व छायाचित्रे आणि व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहू शकणार आहोत.