शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आता गुगल बोलायला शिकवणार

By अनिल भापकर | Updated: March 20, 2019 11:47 IST

माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने आता भारतीय मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचायला आणि बोलायला शिकविण्याचा विडा उचलला आहे.

ठळक मुद्देलहान मुलांना हिंदी, इंग्रजीत बोलण्याचे आणि वाचण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गुगलने ' बोलो '(bolo) हे अॅप नुकतेच लॉन्च केले आहे.अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बोलो या अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना होणार आहे.

अनिल भापकर

माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने आता भारतीय मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचायला आणि बोलायला शिकविण्याचा विडा उचलला आहे. लहान मुलांना हिंदी, इंग्रजीत बोलण्याचे आणि वाचण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गुगलने ' बोलो '(bolo) हे अॅप नुकतेच लॉन्च केले आहे.ज्याद्वारे गुगल लहान मुलांना हिंदी आणि इंग्रजी बोलायला आणि वाचायला शिकवणार आहे.

हे अॅप कसे काम करणार ?

नुकतेच बोलो हे अॅप भारतात लॉंच करण्यात आले असून या अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अॅपमध्ये दिया नावाचे एक अॅनिमेटेड पात्र देण्यात आले असून ते लहान मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहन देईल तसेच वाचताना जर काही शब्दांचे उच्चार करण्यास काही अडचण आल्यास त्यातही मुलांची मदत करेल. जर लहान मुले वाचताना एखादा शब्द अडखळले तर दिया तो शब्द योग्य पद्धतीने कसा वाचावा हे सांगणार आहे . या अॅपमुळे विद्यार्थांच्या मनातील इंग्रजीविषयीची भिती नाहीशी होण्यास मदत होणार आहे .दिया या अॅनिमेटेड पात्रामुळे लहान मुलांना बोलो हे अॅप वापरताना आणखीनच मजा येईल . त्यामुळे हसत खेळात शिक्षण हि संकल्पना प्रत्यक्षात येण्यास निश्चितच मदत होईल आणि त्याबरोबरच लहान मुलांचे मनोबल देखील वाढेल.

बोलो या अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना होणार आहे. उत्तरप्रदेशमधील जवळपास २०० गावांमध्ये या अॅपची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे अशी  माहिती गुगल इंडियाचे  नितिन कश्यप यांनी दिली .

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर अगदी मोफत उपलब्ध असून याची साईज जवळपास ५० एमबी पर्यंत आहे . हे अॅप ऑफलाईन देखील काम करते .म्हणजे एकदा का बोलो अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाले कि बस्स. फक्त हे अॅप वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड ४.४ किंवा त्यापेक्षा लेटेस्ट अँड्रॉइड लागेल . या अॅप मध्ये लहान मुलांसाठी हिंदी आणि इंग्रजीच्या अनेक रंजक गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणार आहे.भविष्यामध्ये इतर भारतीय भाषांचा देखील यामध्ये समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे गुगलने सांगितले आहे. 

anil.bhapkar@lokmat.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगलMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड