शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Apple iPhone Event : आयफोननंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही, नवे फिचर्स पाहून तुम्ही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 09:38 IST

आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणा-या स्टिव्ह जॉब्जच्या अ‍ॅपलने आता टीव्ही लॉन्च केला आहे.

सॅन फ्रान्सिस्को, दि. 12 - आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणा-या स्टिव्ह जॉब्जच्या अ‍ॅपलने आता टीव्ही लॉन्च केला. यासाठी खास 4K HDR अशी प्रणाली तयार केली आहे. विशेष म्हणजे एचडी टीव्हीच्या किमतीतच हा अ‍ॅपल टीव्ही उपलब्ध होणार आहे.

स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. त्यांनी सुरुवातील स्टिव्ह जॉब्ज थिएटरचे औपचारिकरित्या उद्घाटन केले. त्यानंतर टीम कुक यांनी अ‍ॅपल वॉच लाँच केली. त्यानंतर आला टीव्ही. अ‍ॅपल टीव्हीची घोषणा करताना व्यासपीठावरील स्क्रीनवर 4K असा शब्द आला आणि सर्वांची उत्सुकता तानली गेली. फोर के म्हणजे, चार हजार. आतापर्यंतच्या एचडी टीव्हीच्या तुलनेत चार हजार पट उत्तम असलेला हा टीव्ही लाँच करत असल्याची टीम कुक यांनी केली. 

या टीव्हीची किंमत किती?सध्या या अ‍ॅपल टीव्हीची किंमत 149 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. भारतीय रूपयाची तुलना केली तर केवळ साडेनऊ हजार रुपयांना आहे. हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो 22 सप्टेंबरपासून मिळेल. 

या टीव्हीवर काय असेल?- एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन  क्षमता असेल. - साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.- नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील. - अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.- तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.- याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात.

जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे.

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X