नू मोबाइलचे चार स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: August 25, 2017 09:14 AM2017-08-25T09:14:30+5:302017-08-25T09:17:23+5:30
नू मोबाइल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत चार स्मार्टफोन लाँच केले असून या सर्व मॉडेल्समध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे.
नू मोबाइलने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतांना एक्स५, एम३, क्यू६२६ आणि क्यू५०० हे चार स्मार्टफोन ग्राहकांना सादर केले आहेत. हे सर्व स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच देशभरातल्या शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येणार आहेत. यांचे मूल्य ९,९९९ ते १५,९९९ रूपयांच्या दरम्यान असेल.
नू क्यू५००
नू मोबाइल कंपनीचा हा सर्वात स्वस्त दराचा स्मार्टफोन आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर उर्वरित फिचर्समध्ये ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदींचा समावेश असेल.
नू क्यू६२६
नू क्यू६२६ या मॉडेलमध्येही पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर उर्वरित फिचर्समध्ये ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी देण्यात आले आहेत.
नू एम३
नू एम३ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या ते तब्बल १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. याशिवाय यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदींचा समावेश असेल. तर यातील बॅटरी ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आली आहे.
नू एक्स ५
नू एक्स५ हा स्मार्टफोन ५.५ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी म्हणजे १०८० बाय १९२० पिक्सल्सच्या डिस्प्लेने सज्ज आहे. याची रॅम तीन जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. यात एलईडी फ्लॅश, बर्स्ट मोड, पॅनोरामा, लाईव्ह फोटो आदी फिचर्स असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा असून यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यात २९५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.