शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन

By शेखर पाटील | Updated: January 19, 2018 12:03 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे. कधी काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असणार्‍या नोकिया कंपनीवर मध्यंतरी कठीण वेळ आली होती. या कंपनीला मोबाइल उत्पादनाच्या युनिटची विक्री करावी लागली. नंतर एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ब्रँडला पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न केले असून यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाले आहेत.

एक वर्षाच्या आत एचएमडी ग्लोबलने नोकिया ब्रँडचे फिचरफोन्स आणि स्मार्टफोन्स लाँच केले असून याचे तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त मॉडेल्स विकले गेले आहेत. यात अगदी प्राथमिक स्वरूपाच्या फिचरफोन्ससह फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील मॉडेल्सचाही समावेश होता. याच पद्धतीनं नोकिया ब्रँड विविध किंमतपट्टयातील मॉडेल्स सादर करण्याच्या तयारी आहे. यासोबत आता नोकिया आशा या मालिकेचेही पुनरागमन होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.नोकिया आशा या मालिकेतील काही मॉडेल्स २०११ ते २०१३च्या दरम्यान चांगल्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. विशेष करून नोकिया आशा ५०१ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत चांगले विकले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर, एचएमडी ग्लोबल कंपनी या मालिकेला पुनरूज्जीवीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एमएमडी ग्लोबल कंपनीकडे या मालिकेचा ट्रेडमार्क हस्तांतरीत करण्यात आला असून येत्या काही दिवसात या मालिकेत काही मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याचा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNokiaनोकियाMobileमोबाइल