Nokia C12 Pro: भारतात लॉन्च झाला Nokia चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:31 PM2023-03-27T14:31:03+5:302023-03-27T14:31:28+5:30

नोकियाने एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Nokia C12 Pro: Nokia's cheapest smartphone launched in India, priced below 7 thousand... | Nokia C12 Pro: भारतात लॉन्च झाला Nokia चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी...

Nokia C12 Pro: भारतात लॉन्च झाला Nokia चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी...

googlenewsNext


Nokia C12 Pro Price in India:नोकियाने एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही एखाद्या एन्ट्री लेव्हल स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर नोकियाचा हा नवीन फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला क्लीन UI मिळेल. Nokia C12 Pro असे या स्मार्टफोनचे नाव असून, या फोनला दोन स्टोरेज आणि तीन कलर ऑप्शनसह बाजारात आणले आहे. 

कॅमेरा आणि डिस्प्ले
Nokia C12 Pro फोनमध्ये 6.3-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो HD+ रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. यासह, 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला आहे. यामध्ये तुम्हाला क्लीन अँड्रॉइडचा एक्सपेरियन्स मिळतो. कंपनीने नुकताच Nokia C12 देखील लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. 

स्टोरेज
नोकियाने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. याचे लोअर-एंड मॉडेल 2GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसह 6,999 रुपयांना येते. तर, 3GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. दोन्ही फोनमध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम मिळते. लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन मिळेल.

वैशिष्ट्य काय आहेत?
Nokia C12 Pro मध्ये ड्युअल सिम सपोर्टसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 12 (Go Edition) वर काम करतो. फोनमध्ये 3000mAh बॅटरी मिळते, जी 5W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.

Web Title: Nokia C12 Pro: Nokia's cheapest smartphone launched in India, priced below 7 thousand...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.