शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नोकिया ६ स्मार्टफोनची ४ जीबी रॅमयुक्त आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: February 16, 2018 12:42 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनची ४ जीबी रॅम असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनची ४ जीबी रॅम असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने फेब्रुवारी २०१७ मध्ये नोकिया ६ हे मॉडेल लाँच केले होते. तर भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन जून २०१७ मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. आता हेच मॉडेल नोकिया ६ (२०१८) या नावाने लाँच करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल हा रॅम व स्टोअरेजमध्ये करण्यात आला आहे. आधीचे मॉडेल हे ३ जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजयुक्त होते. तर नवीन आवृत्तीत ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणार आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हा अपवाद वगळता यातील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असतील. अर्थात नोकिया ६ (२०१८) या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ ते सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

नोकिया ६ (२०१८) हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे एचएमडी ग्लोबल कंपनीने जाहीर केले आहे. याचे मूल्य १६,९९९ रूपये इतके असून यासोबत ग्राहकांना २ हजार रूपयांचा एक्सचेंज डिस्काऊंट देऊ करण्यात आला आहे.  

टॅग्स :Nokiaनोकिया