शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकिया ३.१ स्मार्टफोन दाखल : जाणून घ्या फिचर्स

By शेखर पाटील | Updated: July 23, 2018 13:15 IST

मध्यम किंमतपट्टयातील नोकिया ३.१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा एचएमडी ग्लोबल कंपनीने केली आहे.

मध्यम किंमतपट्टयातील नोकिया ३.१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा एचएमडी ग्लोबल कंपनीने केली आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या वर्षी भारतात नोकिया ३ हा स्मार्टफोन लाँच केला होता. याला चांगला प्रतिसाद लाभला होता. आता याचीच पुढील आवृत्ती नोकिया ३.१ या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. 

नोकिया ३.१ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉनींग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात मीडीयाटेकचा ऑक्टा-कोअर ६७५० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून यात ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश असणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४.६ अंशातील व्ह्यू असणारा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

नोकिया ३.१ या मॉडेलला ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगामध्ये सादर करण्यात आले असून याचे मूल्य १०,४९९ रूपये इतके आहे. याला पेटीएम मॉल आणि नोकियाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीत ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. तर लवकरच हे मॉडेल ऑफलाईन म्हणजेच देशभरातील शॉपीजमधूनही उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबत कंपनीने प्रारंभी काही ऑफर्सदेखील जाहीर केल्या आहेत. पेटीएम मॉलवरून याला खरेदी करणार्‍याला १० टक्के इतका कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही रक्कम रिचार्जसह पेटीएमवरील अन्य खरेदीसाठी वापरता येणार आहे. याशिवाय ग्राहकाला प्रत्येकी २५० रूपये असे दोन कॅशबॅक व्हाऊचर्सदेखील देण्यात येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट अथवा डेबीट कार्डवरून याला खरेदी करणार्‍याला ५ टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर एयरटेल आणि व्होडाफोन कंपनीने याला खरेदी करणार्‍याला २८ दिवसांपर्यंत प्रति-दिवस एक जीबी इतका मोफत डाटा देण्याचे जाहीर केले आहे.

नोकिया ३ या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रसिसाद लाभला होता. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे होता. तथापि, नोकिया ३.१ हा स्मार्टफोन अँड्रॉइड वन या विशेष आवृत्तीवर चालणारा आहे. मुळातच आता शाओमीसह अन्य चीनी कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स असणारे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामुळे नोकिया ३.१ या मॉडेलला बाजारपेठेत अतिशय तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब उघड आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNokiaनोकियाMobileमोबाइल