शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Noise Air Buds Mini झाले भारतात लाँच; कमी किंमतीत मिळत आहे टच कंट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 16:56 IST

Noise Air Buds launch: Noise Air Buds Mini फ्लिपकार्टवर 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.  

Noise ने Air Buds Mini ट्रू व्हायरलेस स्टीरियो (TWS) इयरबड्स भारतात लाँच केले आहेत. स्टेम स्टाईल डिजाईनसह येणाऱ्या या इयरबड्सचे वजन फक्त 4 ग्राम आहे. कमी किंमतीत पण हे बड्स टच कंट्रोल आणि वॉटर रेजिस्टन्स सारख्या फीचर्ससह येतात. (Noise launches Noise Air Buds Mini earbuds at 1499 Rs. Will be available from 25 June) 

Noise Air Buds Mini ची किंमत  

Noise Air Buds Mini भारतात 1,499 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहेत. हे बड्स जेट ब्लॅक आणि पर्ल व्हाइट रंगात उपलब्ध होतील. यांची विक्री Noise च्या अधिकृत वेबसाईटवरून आणि Flipkart वरून 25 जूनपासून केली जाईल.  

Noise Air Buds Mini चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

Noise Air Buds Mini मध्ये 14.2mm चे ड्राइवर्स देण्यात आले आहेत. यात Tru Bass टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे त्यामुळे या बड्समध्ये खूप बेसची निर्मिती होते. इयरबड्समध्ये कनेक्टिविटीसाठी Bluetooth v5 देण्यात आलं आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या डिवाइसेजसोबत हे बड्स वापरता येतील. एकदा चार्ज केल्यावर हे इयरबड्स 3.5 तास चालतात आणि जर चार्जिंग केस सोबत असेल तर 11.5 तासांचा प्लेबॅक टाइम मिळू शकतो. इयरबड्स 1.5 तासात चार्ज होतात तर चार्जिंग केस चार्ज होण्यास 2 तासांचा वेळ लागतो.  

यात IPX4 सुरक्षा देण्यात आली आहे, त्यामुळे हे पाणी व घामापासून सुरक्षित राहतात. या इयरबड्समध्ये हॅन्ड्स-फ्री कॉलिंग, कॉल स्विच आणि वॉइस असिस्टेंस असे फीचर्स देण्यात आले आहेत. यातील टच कंट्रोल फीचर वापरून वॉल्यूम, ट्रॅक, कॉल्स आणि वॉइस असिस्टंट अ‍ॅक्टिव्हेट करता येतात. कॉलिंगसाठी दोन्ही इयरबडमध्ये वेगवेगळे माइक देण्यात आले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान