शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आता पासवर्ड नाही तुमचा चेहरा पाहून लॉगइन होईल तुमचे अकाऊंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 17:32 IST

विविध वेबसाइट्सवर लॉगइन करण्यासाठी आता युझर्सना आयफोन प्रमाणेच फेसआयडी ऑथेंटिकेशनचा वापर करता येणार आहे. एका नव्या माहितीनुसार काही काळानंतर युझर्स पासवर्ड टाइप न करताच  आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकणार आहेत.

नवी दिल्ली - विविध वेबसाइट्सवर लॉगइन करण्यासाठी आता युझर्सना आयफोन प्रमाणेच फेसआयडी ऑथेंटिकेशनचा वापर करता येणार आहे. एका नव्या माहितीनुसार काही काळानंतर युझर्स पासवर्ड टाइप न करताच  आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकणार आहेत.  Fido Alliance आणि W3C कडून लॉन्च करण्यात आलेले नवे वेब ऑथेंटिकेशन स्टँडर्ड इन्क्रिप्टेड आहे आणि ही प्रणाली पासवर्डसोबतच फिंगरप्रिंट सेंन्सर्स, कॅमेरा आणि यूएबी बटण यांसारख्या सिक्युरिटी सिस्टीमची जागा घेऊ शकते.  या संदर्भात माहिती देताना W3C website ने सांगितले की, हे स्पेसिफिकेशन, एपीआय क्षमता असलेल्या तंत्रज्ञानाला समोर आणते आणि तसेच त्यामुळे ऑथेंचिकेटेड युझर्ससाठी भक्कम, अटेस्टेड आणि पब्लिक की आधारित वेब अॅप्लिकेशन वापर शक्य होणार आहे. मोझीला फायरफॉक्स ही या तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली कंपनी आहे. तर  गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज सध्या ही सिस्टीम वापरात आणण्यावर काम करत आहेत. आता येत्या काही महिन्यांमध्ये या ब्राऊझर्सवरही ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओपेरा ब्राऊझर्सवरही नव्या लॉगिनला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. मात्र अॅपलच्या सफारीवर नव्या वेब ऑथेंटिकेशन लॉगिन प्रक्रिया येण्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.   कोणताही युझर फोनवर एक वेबसाइटमध्ये आधीपासून लॉगइन असेल तर त्याला 'register this device with example.com?' असा मेसेज येईल. त्याला सहमती दर्शवल्यावर फोन युझर्सच्या आधी कॉन्फिगर झालेल्या पीन आणि बायोमेट्रिक संकेतांकांबाबत  विचारणा करेल. त्यानंतर एकदा ऑथराइज्ड झाल्यावर ही वेबसाइट रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज पाठवेल. डेस्कटॉपवरसुद्धा वेबसाइट युजर्स आपल्या हँडसेटवर पूर्ण करण्यात आलेल्या स्टेप्सवर परफॉर्म करण्यास सांगेल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानnewsबातम्या