या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही? नवीन Nokia स्मार्टफोन 27 जुलैला होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 11:54 AM2021-07-14T11:54:04+5:302021-07-14T11:56:23+5:30

Nokia Phone 27 July Launch: Nokia 27 जुलैला Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

new nokia phone launching on 27 july  | या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही? नवीन Nokia स्मार्टफोन 27 जुलैला होणार लाँच 

या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही? नवीन Nokia स्मार्टफोन 27 जुलैला होणार लाँच 

Next

भारतात Nokia चे चाहते मोठ्याप्रमाणावर आहेत आणि हे फॅन्स कंपनीच्या नवीन स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट बघत असतात. आता कंपनीने सांगितले आहे कि, येत्या 27 जुलैला नवीन नोकिया फोन भारतात लाँच केला जाईल. कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून केली आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या नावाचा उल्लेख केला नाही. परंतु, हा आगामी नोकिया स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच दमदार बिल्ड क्वॉलिटीसह येणार असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.  (Nokia may launch Nokia X10 and Nokia X20 in India on 27 July)

नोकिया इंडियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वर्तुळाकार कॅमेरा सेटअप असलेल्या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला आहे. सोबत कंपनीने सांगितले आहे कि हा आगामी स्मार्टफोन 27 जुलैला सादर केला जाईल. ही डिजाईन Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोनच्या डिजाईन सारखी दिसते. त्यामुळे या दोन पैकी एक किंवा दोन्ही स्मार्टफोन कंपनी भारतात लाँच करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

Nokia X10 आणि Nokia X20 चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia X सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. Nokia X10 आणि Nokia X20 अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आले आहेत, तसेच हे फोन्स आक्टाकोर प्रोसेसरसह ड्युअल मोड 5Gला सपोर्ट करणाऱ्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटवर चालतात. 

फोटोग्राफीसाठी या दोन्ही नोकिया फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळतो. Nokia X20 मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे तर Nokia X10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरला सपोर्ट करतो. दोन्ही फोनमध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच नोकिया एक्स10 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि एक्स20 32 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या दोन्ही नोकिया फोन्समध्ये 4,470एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: new nokia phone launching on 27 july 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.