शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

WhatsApp Hack करण्याची नवीन पद्धत; एक चूक अन् स्कॅमर्सच्या हाती तुमचे अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 18:00 IST

WhatsApp Hack: पूर्वी फेसबुकवरुन स्कॅम केले जायचे, पण आता व्हॉट्सअॅपवरुनही स्कॅम सुरू झाले आहेत.

WhatsApp Hack: स्कैमर्स, लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धती वापरतात. अशाच एका पद्धतीबाबत पोलीस लोकांना सावध करत आहेत. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये लोकांना whatsApp scam बद्दल सांगितले आहे. विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर हा इशारा देण्यात आला आहे.

मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने बनावट फेसबुक आयडी बनवून पैशांची मागणी केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकरण देखील तशाच स्वरुपाचे आहे. पण, यात फेसबुकऐवजी WhatsApp चा वापर केला आहे. याची सुरुवात जागतिक योग दिनापासून म्हणजेच 21 जून रोजी झाली.

अशी होते फसवणूक या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्कॅमर्स आधी युजरचे Facebook अकाउंट हॅक करतात आणि हॅक झालेल्या अकाउंटमधून त्याच्या फेसबुकवरील मित्रांना Yoga Classes जॉईन करण्यास सांगतात. यानंतर स्कॅमर एक लिंक पाठवतो आणि समोरच्या व्यक्तिला त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतो.

लिंकवर क्लिक केल्यानंतर स्कॅमर, युजरला 6 अंकाचा OTP मागतो. युजरने त्याला OTP सांगितल्यावर स्कॅमरला त्याच्या व्हट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळतो. युजरने जो OTP शेअर केला, तो एक WhatsApp व्हेरिफिकेशन कोड असतो.

WhatsApp Hack झाल्यानंतर काय होईल? या कोडच्या मदतीने स्कॅमर्सला युजरचा व्हॉट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळतो. यानंतर युजरच्या अकाउंटवरुन अनेकांना पैशांची मागणी करणारे मेसेज जातात. समोरच्या व्यक्तीला वाटते, मेसेज करणारा ओळखीचा व्यक्ती आहे, पण असतो स्कॅमर. अशा पद्धतीने व्हॉट्सअॅपवर स्कॅम केले जात आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपfraudधोकेबाजीtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम