शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 18:08 IST

सध्या वाय फायचे युग आहे. त्यातच फोर-जी टेक्नॉलॉजी आल्याने जवळपास प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन मिळत आहे. पण आता त्याहीपुढे जात 'लायफाय' टेक्नोलोजी आगामी काळात अधिराज्य करण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देहवेऐवजी प्रकाशाच्या माध्यमातून पोचणार संदेश वायफायपेक्षा शंभरपट वेगाने मिळणार इंटरनेट 

पुणे :  वायफायमुळे प्रत्येकवेळी डेटा पॅक मारायलाच हवा ही संकल्पना आता दूर झाली आहे. केवळ घरी किंवा कार्यालयात नाही तर आता सार्वजनिक ठिकाणीही मोफत वायफाय सुरु झाले आहे. हे सर्व जरी असले तरी अनेकदा वायफायचा वेग कमी झाल्याने इंटरनेटचाही वेग मंदावतो आणि कामावर परिणाम होतो. पण भविष्यात ही चिंता असणार नाही कारण वायफायच्या जागी वायफाय येणार आहे. लायफाय म्हणजे लाईट फायडेलिटी. हवेच्या माध्यमातून चालणाऱ्या वायफाय ऐवजी प्रकाशाच्या माध्यमातून चालणारे नेटवर्किंग म्हणजे लायफाय. अर्थात हवेच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग अधिक असल्यामुळे यातून नेटवर्किंग सुपरफास्ट होणार आहे.

    स्कॉटलॅँडमधील एडिनबर्ग विद्यापीठात संशोधन करणार्‍या हेरॉल्ड हास  यांनी  २०११ मध्येच वायफाय नेटवर्क सिद्ध केले होते. या प्रयोगातून त्यांनी एखाद्या मोबाइल फोनच्या टॉवरपेक्षाही जास्त डेटा अत्यंत कमी कालावधीत पाठवून दाखवला. याबाबत काही ठिकाणी अजूनही प्रयोग करणे सुरु आहे. पण असे झाले तर सध्याच्या स्पीडपेक्षा शंभरपट वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. शिवाय राउटर किंवा कोणतीही सामुग्री वापरायची गरज उरणार नाही. दुर्गम भागातही इंटरनेटचे जाळे सहज पसरू शकेल. याबाबत संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी बोलताना हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आले तर सेंकदाला एक चित्रपट डाउनलोड करणे शक्य होणार आहे.अर्थात कोणत्याही दिव्याखाली इंटरनेट मिळणार नसून त्यासाठी दिव्याला विशिष्ट चीप बसवावी लागेल असेही त्यांनी सांगितले. भारतात हे तंत्रज्ञान सध्यातरी कोणी प्रायोगिक स्तरावरही स्वीकारले नसले तरी त्याची जगभरात चाचपणी झाल्यावर भारतातही आगामी काळात अंमलबजावणी होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील काही वर्षांत जगात १४ दशअब्ज एलइडी दिवे असतील असा अंदाज आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लायफाय जोडण्याही होऊ शकतात असेही ते म्हणाले.   

  

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :InternetइंटरनेटWiFiवायफायtechnologyतंत्रज्ञान