शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉरवर्ड फॉरवर्ड’ नावाचा नवा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 08:10 IST

मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणे झाली तरीही चालतात; पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणे अनेकांना कठीण होऊन बसते.

व्हॉट‌्सॲप आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्याला एक नवी सवय लागली आहे, जिचे नाव आहे फॉरवर्ड! कुठलाही नवीन ग्रुप तयार झाला की लगेच त्या ग्रुपवर सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात कोण टाकतेय याची चढाओढ चालू होते. एखाद्या ग्रुपवर ‘सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवू नयेत’, अशा सूचना दिलेल्या असतील तरीही मेसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. शिवशिवणाऱ्या बोटांना रोखता येत नाही.

मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणे झाली तरीही चालतात; पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणे अनेकांना कठीण होऊन बसते. इतकेच नव्हे, तर फॉरवर्ड करण्याच्या नादात आपण खोटी, चुकीची माहिती फिरवतोय हेही लक्षात येत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. यात बाह्य बदल काही होत नसले तरी वर्तणुकीतले बदल मात्र झपाट्याने होतात. अनेकदा आपल्या लक्षात येतात, काही वेळा येतही नाहीत. फॉरवर्डर्सवरचे जोक्स आणि मीम्स आपण खूप बघतो, वाचतो, हसतो आणि फॉरवर्डही करतो; पण या फॉरवर्डच्या नव्या सवयीमुळे आपल्या वर्तणुकीत कोणते बारीकसारीक बदल होतात हेही समजून घेऊया.  

आपल्या वर्तणुकीत कोणते बदल होताहेत?

१) सतत व्हॉटस्‌ॲप चेक करण्याची सवय लागते. २) आलेला प्रत्येक व्हिडिओ, फोटो डाऊनलोड करून बघणे गरजेचे बनून जाते.३) उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाइल चेक करताना काल केलेल्या स्टेटस अपडेटस्‌ ना किती आणि काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत, लाइक्सची संख्या वाढली आहे का, याकडे लक्ष लागून असते.४)  व्हर्चुअल जगामुळे माणसांमधला संयम कमी होतोय. नकारात्मक भावना वाढताहेत. माणसांचे मत आता व्हर्चुअल जग ठरवतेय.  ५) माणसे खूप बोलतात; पण विचार करतातच असे नाही. विचार करून बोलतात असेही नाही.६) पालक, आजी, आजोबा.. सतत ऑनलाइन होतोय. ७) खोटे बोलण्याचे प्रमाण वाढलेय. फॉरवर्ड करण्याच्या मोहात असे अनेक बदल घडताहेत. म्हणून कुठलाही मेसेज, फोटो व्हिडिओ फॉरवर्ड करण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. कुठले?- वाचा पुढच्या भागात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल