शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आला नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेट !

By शेखर पाटील | Updated: October 6, 2017 18:19 IST

गुगलने आपल्या डे ड्रीम व्ह्यू या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेटची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

आभासी सत्यता अर्थात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा अगदी सर्वसामान्यांनाही लाभ घेता यावा म्हणून गुगलने प्रारंभी फक्त कार्डबोर्डच्या मदतीनेच प्राथमिक हेडसेट तयार केला होता. याला उदंड प्रतिसाद लाभला होता. जगभरात विविध कंपन्यांनी यावरून तयार केलेले लक्षावधी हेडसेट विकले गेले असून याची लोकप्रियता अद्यापही अबाधित आहे. यानंतर यातच सुधारणा करून गेल्या वर्षी डे ड्रीम व्ह्यू हा व्हिआर हेडसेट सादर करण्यात आला होता. आता याचीच नवीन आवृत्ती ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

नवीन डे ड्रीम व्ह्यूचे मूल्य ९९ डॉलर्स असून हा हेडसेट १९ ऑक्टोबरपासून ग्राहकांना प्रत्यक्षात मिळणार आहे. यातील बहुतांश फिचर्स हे आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहेत. हा सेटदेखील अतिशय उत्तम दर्जाच्या कापडापासून तयार करण्यात आला आहे. यात आधीच्या मॉडेल्सपेक्षा नवीन रंगांचे पर्याय सादर करण्यात आले आहेत. याच्या सोबत अतिशय उत्तम दर्जाचा कंट्रोलरही प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने या हेडसेटच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन शक्य आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक दर्जेदार ऑप्टीक्स असतील. यामुळे याच्या मदतीने अतिशय उत्तम पध्दतीने आभासी सत्यतेची अनुभुती घेता येणार असल्याचे गुगलने सूचित केले आहे.

हा हेडसेट नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या गुगल पिक्सेल २ आणि गुगल पिक्सेल २ एक्सएल या मॉडेलसह सॅमसंग गॅलेक्सी एस ८, सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस, सॅमसंग गॅलेक्सी नोट ८, असुस झेनफोन एआर, झेडटीई अ‍ॅक्झॉन ७, हुआवे मेट ९ प्रो, मोटो झेड/झेड२ आदी स्मार्टफोन्सवर वापरणे शक्य आहे. तर लवकरच अन्य स्मार्टफोन्सवरही हा हेडसेट वापरता येणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे.

पहा: नवीन डे ड्रीम व्ह्यू व्हिआर हेडसेटची माहिती देणारा व्हिडीओ.

टॅग्स :googleगुगल