शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Netflix पाहणाऱ्यांना मोठा झटका! पासवर्ड शेअर करण्यावर बंदी, अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:25 IST

कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. नेटफ्लिक्सने आता स्पष्ट केले आहे की, अकाउंट पासवर्ड शेअर न केल्याने कंपनीला युजर्स वाढण्यास मदत होत आहे.

नवी दिल्ली : नेटफ्लिक्स (Netflix) वापरणाऱ्या युजर्सना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या नेटफ्लिक्सने आधीच 2023 च्या पहिल्या तिमाहीपासून पासवर्ड शेअरिंग फीचर्स बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकतेच आपले तिमाही रिझल्ट जाहीर केले आहेत. युजर्सनी आपले नेटफ्लिक्स अकाउंट शेअर केल्यामुळे कंपनीच्या कमाईत घट झाल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. नेटफ्लिक्सने आता स्पष्ट केले आहे की, अकाउंट पासवर्ड शेअर न केल्याने कंपनीला युजर्स वाढण्यास मदत होत आहे.

Netflix FAQ पेजवरील पोस्टनुसार, सिंगल नेटफ्लिक्स अकाउंटला आता फक्त एकाच घरात राहणारे लोकच अॅक्सेस करू शकतील. जे त्याच पत्त्यावर राहत नाहीत, त्यांना प्रायमरी अकाउंट होल्डर म्हणून नेटफ्लिक्स पाहण्यासाठी त्यांचे स्वतःचे अकाउंट वापरावे लागेल. आता ग्राहकांच्या घराबाहेर राहणाऱ्या युजर्ससोबत पासवर्ड शेअर करणे खूप कठीण होणार आहे. तसेच, सिंगल नेटफ्लिक्स अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च येऊ शकतो. 

जर प्रायमरी अकाउंटसोबत लिंक केलेले नवीन डिव्हाइस वेगळ्या ठिकाणी असल्यास नेटफ्लिक्स प्ले करण्यासाठी 4-अंकी कोड आवश्यक असणार आहे. या कोडला रिक्वेस्ट अॅक्सेस केल्यानंतर 15 मिनिटांच्या आत इंटर करण्याची गरज आहे. दरम्यान, दुसऱ्या लोकेशनमध्ये डिव्हाइसला फक्त 7 दिवस नेटफ्लिक्स अकाउंट चालवण्याची परवानगी असणार आहे. नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की, प्रायमरी डिव्हाइससह प्रवास करणार्‍या युजर्सला इतर लोकेशनमध्ये नेटफ्लिक्स चालविण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चांगल्या आणि सुलभ नेटफ्लिक्स अॅक्सेससाठी युजर्सला आपल्या प्रायमरी लोकेशनवर दर 31 दिवसांच्या आत वाय-फायशी कनेक्ट करावे लागेल.

सर्व देशांमध्ये बंद होईल पासवर्ड शेअरिंग फीचर नेटफ्लिक्सने अर्जेंटिना, अल साल्वाडोर, ग्वाटेमाला, होंडुरास आणि डोमिनिकन रिपब्लिक यांसारख्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्यासंबंधी टेस्ट सुरू केली आहे. जर युजस्स आपल्या घराबाहेर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ नेटफ्लिक्स अकाउंट चालवत असतील तर त्यांना जवळपास 3 डॉलर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. सध्या इतर देशांमध्ये या फीचरच्या रोल आउटबद्दल कोणतीही माहिती नाही. पण 2023 मध्ये पासवर्ड शेअरिंग फीचर इतर देशांमध्येही बंद केले जाऊ शकते.

नेटफ्लिक्सचा फोकस रेव्हेन्यूवरआपला महसूल वाढवण्यासाठी नेटफ्लिक्स जाहिरातींवर देखील खूप लक्ष देत आहे. कंपनीने 2022 मध्ये जाहिरात-आधारित योजना लॉन्च केली, ज्याची किंमत प्रति महिना 6.99 डॉलर (सुमारे 572 रुपये) आहे. ही योजना ऑस्ट्रेलिया, ब्राझील, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सtechnologyतंत्रज्ञान