शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नवरात्र स्पेशल: सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लसच्या मूल्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:08 IST

सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता

ठळक मुद्देगॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये बिक्सी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहेगॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील

सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. यात आधीदेखील दरात कपात करण्यात आली होती. आता पुन्हा चार हजार रूपयांनी दर घटविल्यामुळे याचे मूल्य आता ५०,९९० रूपये इतके असेल. तर सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे मॉडेल भारतात ६४,९९० रूपये मूल्यात आधी मिळत होते. आता ते ६०,९९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येईल. तर या स्मार्टफोनच्या सहा जीबी व्हेरियंटचे मूल्यदेखील एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले असून हे मॉडेल आता ग्राहकांना ६४,९९० रूपयात मिळणार आहे. विशेष म्हणजे लाँच झाल्यापासून सॅमसंग गॅलेक्सी एस ८च्या सहा जीबी व्हेरियंटचे मूल्य तब्बल ९ हजारांनी कमी झाले आहे. दरम्यान, या मॉडेल्सला खरेदी करतांना एचडीएफसीच्या ग्राहकांना चार हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरदेखील देण्यात आली आहे.

फिचर्सचा विचार केला असता; सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये बिक्सी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील.  हे दोन्ही मॉडेल्स वॉटर आणि डस्टप्रुफ असतील. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. दोन्ही मॉडेल्सची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. यातील एक व्हेरियंट ६ जीबी रॅमयुक्त आहे. यासोबत मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे.

या दोन्ही मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने कुणीही गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेल्सला लॉक/अनलॉक करू शकेल. याशिवाय यात सॅमसंग पास या नावाचे पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप असेल. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे ३००० आणि ३५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्‍या प्रदान करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान