मोटोरोलाने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G71 लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: November 18, 2021 07:39 PM2021-11-18T19:39:21+5:302021-11-18T19:42:40+5:30

Motorola Moto G71 5G Phone Price Launch: मोटोरोलाने आज अर्धा डझन स्मार्टफोन सादर केले आहेत. यातील Moto G71 5G Phone मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.

Motorola moto g71 5g phone launched with 50mp camera and 5000mah battery  | मोटोरोलाने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G71 लाँच 

मोटोरोलाने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G71 लाँच 

googlenewsNext

Motorola ने आज एक दोन नव्हे तर सहा फोन सादर केले आहेत. एका इव्हेंटमधून कंपनीने Moto G series अंतर्गत Moto G Power (2022), Moto G200, Moto G71, Moto G51, Moto G41 आणि Moto G31 स्मार्टफोन सादर केले आहेत. या लेखात आपण मिड रेंजमधील Moto G71 5G स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत.  

Motorola Moto G71 ची किंमत 

Moto G71 5G स्मार्टफोनची किंमत युरोपमध्ये 299.99 यूरो (अंदाजे 25,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. मोटोरोलाचा हा फोन नेपच्यून ग्रीन, आर्टिक ब्लू आणि आयर्न कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. युरोपनंतर हा फोन जगभरात देखील उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. 

Motorola Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंसाठी यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. 

Moto G71 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. या कॅमेऱ्याला 8MP च्या अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा लेन्सची जोड देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

Web Title: Motorola moto g71 5g phone launched with 50mp camera and 5000mah battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.