पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 21, 2021 01:30 PM2021-10-21T13:30:45+5:302021-10-21T13:31:03+5:30

Upcoming Budget 5G Phone Motorola Moto G51: Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G Phone असेल असे समजते.

Motorola Moto G51 5g Phone specs leaked launch in november with 50MP Camera Price  | पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

googlenewsNext

Budget 5G Phone च्या यादीत Motorola च्या Moto G51 स्मार्टफोनचा लवकरच समावेश होऊ शकतो. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्स मधून हा फोन समोर आला आहे. या लिक्समधून फोनच्या काही स्पेक्सची माहिती उघड झाली आहे. परंतु आता एका रिपोर्टमधून या फोनच्या लाँचची माहिती समोर आली आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल.  

Motorola Moto G51 लाँच  

रिपोर्टनुसार मोटोरोला मोटो जी51 स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये सादर केला जाईल. लीकमध्ये या फोनच्या XT2171-1 मॉडेल नंबर आणि Cyprus 5G या कोडनेमचा उल्लेख आहे. त्यानुसार हा एक 5जी फोन आहे हे समजले आहे. तसेच यात फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल, हे देखील समजले आहे.  

Motorola Moto G51 चे लीक स्पेक्स  

Motorola Moto G51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल. हा फोन 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल.  

गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार Motorola Moto G51 4 जीबी रॅमसह सादर केला जाईल. तसेच यात अँड्रॉइड 11 ओएस मिळेल. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट असल्याचे कोडनेम मधून समजले आहे. ज्याला एड्रेनो 619 जीपीयूची मदत मिळेल. या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G फोन असेल असे वाटत आहे.  

Web Title: Motorola Moto G51 5g Phone specs leaked launch in november with 50MP Camera Price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.