शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Motorola Moto Edge X30: मोटोरोलानं केली कमाल! लाँच केला जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, सर्वच फीचर्स नंबर वन 

By सिद्धेश जाधव | Updated: December 10, 2021 13:15 IST

Motorola Moto Edge X30: Motorola Moto Edge X30 हा Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येणार जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन आहे. तसेच यात अंडर डिस्प्ले 60MP चा सेल्फी कॅमेरा, 68W फास्ट चार्जिंग, 50MP ड्युअल कॅमेरा आणि 144Hz रिफ्रेश रेट असे फीचर्स देखील मिळतात.

Motorola नं चीनमध्ये आपला फ्लॅगशिप Moto Edge X30 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नव्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला फोन आहे. ही एकच गोष्ट या फोनला विकत घेण्यासाठी पुरेशी आहे, परंतु कंपनी यावरच थांबली नाही. फोनमधील 60MP चा सेल्फी कॅमेरा, 68W फास्ट चार्जिंग, 50MP ड्युअल कॅमेरा आणि 144Hz रिफ्रेश रेट हे फीचर्स फोनचा दर्जा अजूनच वाढवता. या फोनचे दोन व्हर्जन आले आहेत, बेस व्हर्जनमध्ये पंच होल कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा मिळतो तर Moto Edge X30 Special Edition मध्ये छुपा अंडर डिस्प्ले कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.  

Moto Edge X30 चे स्पेसिफिकेशन्स 

Moto Edge X30 च्या स्पेक्समधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या फोनमधील Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट आहे. जो जुन्या क्वॉलकॉम प्रोसेसरपेक्षा कितीतरी वेगवान आहे. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी Adreno GPU दिला आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या वेगवान LPDDR5 RAM सह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 256GB पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते. 

Moto Edge X30 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन Android 12 OS वर आधारित MyUI 3.0 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

पॉवर बॅकअपसाठी Moto Edge X30 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या शक्तिशाली फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. Moto Edge X30 मध्ये 60 मेगापिक्सलचा शानदार फ्रंट कॅमेरा मिळतो. 

Moto Edge X30 ची किंमत 

  • Moto Edge X30 8GB/128GB: 3,199 युआन (सुमारे 38,000 रुपये)  
  • Moto Edge X30 8GB/256GB: 3399 युआन (सुमारे 40,300 रुपये)  
  • Moto Edge X30 12GB/256GB: 3,599 युआन (सुमारे 42,700 रुपये)  
  • Moto Edge X30 Special Edition स्मार्टफोन 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह 3,999 युआन (सुमारे 47,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 

 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड