शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

108MP कॅमेरा असलेला मोटोरोलाचा ‘प्रो’ स्मार्टफोन या तारखेला होणार सादर; Motorola India ने दिली माहिती 

By सिद्धेश जाधव | Updated: September 21, 2021 16:32 IST

Motorola Edge 20 Pro Price In India: फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल.  हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे.

ठळक मुद्दे फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल. हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे.

कालच बातमी आली होती कि Motorola येणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. तेव्हा कंपनी नेमका कोणता स्मार्टफोन सादर करणार आहे याचा खुलासा झाला नव्हता. आज कंपनीने अधिकृत टीजर जारी केला आहे. या टीजरमधून आगामी मोटोरोला स्मार्टफोनच्या नावाची माहिती मिळाली आहे.  

मोटोरोला इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. यात ट्विटमध्ये एक फोटो आणि ‘द अ‍ॅब्सोल्यूट प्रो’ अशी कॅप्शन दिली आहे. या टॅगलाईनवरून आगामी हँडसेट मोटोरोला एज 20 प्रो असू शकतो, असे समजते. हा फोन जुलैमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आला होता. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार मोटोरोला एज 20 प्रो भारतात 1 ऑक्टोबरला लाँच केला जाईल. हा फोन जागतिक बाजारात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे. 

Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge 20 Pro मध्ये 6.7-इंचाचा ओएलईडी होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा Turbo LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेजसह मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MYUI 2.0 स्किनवर चालतो.   

या मोटोरोला स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 5x ऑप्टिकल झूम आणि 50x डिजिटल झूमला सपोर्ट करते. हा फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Pro मध्ये 4,520mAh ची बॅटरी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट