शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मोटोरोलाने लॉन्च केला नवा कोरा Moto G14 फोन, कशी कराल प्री-ऑर्डर.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:40 IST

Moto G14 भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. जाणून घ्या त्याची किंमत, फिचर्स अन् सर्वकाही

Motorola ने बजेट सेगमेंट मध्ये एक नवीन फोन लॉन्च केला आहे. Moto G14 स्मार्टफोन हा Moto G13 चा अपग्रेडेड मॉडेल आहे. अनेक दिवसांपासून फ्लिपकार्टवर या फोनची चर्चा केली जात आहे. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. Moto G14 मध्ये 4 GB रॅम, FHD+ डिस्प्ले, 50-मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

Moto G14 ची वैशिष्ट्ये

यात 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यामध्ये डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Unisock T616 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ४ जीबी रॅम आहे. तसेच 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. हे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 13 वर कार्य करते, जो नंतर Android 14 वर देखील अपडेट केला जाईल.

Moto G14 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 20W टर्बो पॉवर चार्जिंग क्षमतेसह येते. हे IP52 संरक्षणासह येते. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.

Moto G14 ची किंमत आणि ऑफर्स-

मोटो फोर जी१४ या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. ते फ्लिपकार्ट वरून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्री-ऑर्डर ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यावर 750 रुपयांची सूट दिली जाईल. त्याच वेळी, 3,200 रुपयांचे विनामूल्य स्क्रीन प्रोटेक्शन देखील दिले जाईल. हे स्काय ब्लू आणि स्टील ग्रे रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याची विक्री 8 ऑगस्टपासून दुपारी 12 वाजेपासून Flipkart, Motorola.in आणि प्रमुख रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

टॅग्स :MotorolaमोटोरोलाMobileमोबाइल