चार्जींगविना दोन दिवस वापरता येईल हा Motorola चा स्मार्टफोन; 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:23 PM2022-01-17T15:23:37+5:302022-01-17T15:23:47+5:30

Moto G Stylus 2022: Moto G Stylus 2022 या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. अँड्रॉइड 11 वर चालणारा हा फोन 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल.

Moto g stylus 2022 with two days battery life and 50mp rear camera launching soon  | चार्जींगविना दोन दिवस वापरता येईल हा Motorola चा स्मार्टफोन; 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

चार्जींगविना दोन दिवस वापरता येईल हा Motorola चा स्मार्टफोन; 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

Next

Motorola सध्या जास्तच सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. कंपनीनं अलीकडेच भारतात अनेक स्मार्टफोन्स सादर केले आहेत, ज्यात Moto G71 या 5G फोनचा देखील समावेश आहे. सध्या कंपनी Moto G Stylus 2022 देखील तयारी करत आहे. आता लाँच पूर्वीच या फोनचा प्रोमो व्हिडीओ लीक झाला आहे. या लीकनुसार हा स्मार्टफोन पंच होल डिजाइन, नाईट विजन मोड असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 2 दिवसांच्या बॅटरी लाईफसह बाजारात येईल.  

Moto G Stylus 2022 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

हा पंच होल डिस्प्ले आणि स्लिम बेजल्ससह सादर केला जाईल. ज्यात स्टायलस सपोर्ट आणि सिक्योरिटीसाठी एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलची डिजाईन पाहता सहा स्मार्टफोन आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.  

या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. फोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळेल. यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. अँड्रॉइड 11 वर चालणारा हा फोन 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स असलेला हा फोन अंदाजे 30,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.  

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

Flipkart Sale: 555 रुपयांमध्ये घरी आणा स्मार्टफोन; Samsung, Realme व Oppo च्या या फोन्सवर धमाकेदार ऑफर्स

Web Title: Moto g stylus 2022 with two days battery life and 50mp rear camera launching soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.