शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:08 IST

Moto G Power 2026 Launched: मोटोरोलाचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो जी पॉवर २०२६ बाजारात दाखल झाला आहे.

मोटोरोलाने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो जी पॉवर (२०२६) जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत या नवीन स्मार्टफोनमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने प्रामुख्याने कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले प्रोटेक्शन आणि नवीन रंगांवर भर दिला आहे. सध्या हा फोन अमेरिका आणि कॅनडामध्ये लॉन्च करण्यात आला असून लवकरच तो इतर देशांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मोटोरोला जी पॉवर २०२६ केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला असून यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. अमेरिकेत हा फोन २९९.९९ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास २७ हजार १०० रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर, कॅनडात या फोनची किंमत ४४९.९९ कॅनेडियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ५५० रुपये) आहे. हा स्मार्टफोन इव्हिनिंग ब्लू आणि प्युअर काश्मीरी या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. येत्या ८ जानेवारी २०२६ पासून या फोनची अधिकृत विक्री सुरू होईल.

या फोनमध्ये ६.८ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे, यात १००० निट्सपर्यंत ब्राइटनेस वाढवण्यासाठी 'हाय ब्राइटनेस मोड' देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षिततेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i मिळत आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर असून हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १६ वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी मोटो जी पॉवर (२०२६) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे, या नवीन मॉडेलमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला. याशिवाय, या फोनमध्ये ऑटो नाईट व्हिजन, पोर्ट्रेट मोड आणि एआय शॉट ऑप्टिमायझेशन यांसारखे फीचर्सही देण्यात आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Motorola G Power (2026) Launched: 32MP Selfie, Enhanced Features

Web Summary : Motorola G Power (2026) debuts with camera and display upgrades. Featuring a 6.8-inch FHD+ display, MediaTek Dimensity 6300, 8GB RAM, 128GB storage, and a 50MP dual camera setup. Available in the US and Canada.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMotorolaमोटोरोला