शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

'एक Like करा आणि ५० रुपये मिळवा'च्या नादात गमावले १ कोटी! कसा फसला? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:52 IST

खिसे कापूंपासून सावधान असं बस स्टँड आणि काही रेल्वे स्थानकांवर लावलेले फलक तुम्ही पाहिले असतीलच पण आता इंटरनेटवरही असे फलक लावण्याची वेळ आली की काय?

खिसे कापूंपासून सावधान असं बस स्टँड आणि काही रेल्वे स्थानकांवर लावलेले फलक तुम्ही पाहिले असतीलच पण आता इंटरनेटवरही असे फलक लावण्याची वेळ आली की काय? असं म्हणावं लागणार आहे. कारण इंटरनेटवरील स्कॅममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राइम अंतर्गत आता वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना फसवलं जात आहे.

इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात ऑनलाइन फ्रॉडचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत आहे. स्कॅमर्स वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची फसवणूक करत आहेत. कधी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून तर कधी कुणी नातेवाईकाच्या नावानं फसवणूक केली जात आहे. यातच एक नवं प्रकरण समोर आलं आहे ज्याला Money for Like स्कॅम म्हटलं जात आहे. या स्कॅममध्ये वेगळीच पद्धत वापरली जात आहे. 

पुण्यात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे.  स्कॅमअंतर्गत पीडितानं आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. पोलिसांनी सांगितलं की संबंधित व्यक्तीसोबत १.१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?६५ वर्षीय निवृत्त निर्णय अधिकाऱ्यानं गेल्या आठवड्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. फेब्रुवारीत एका स्कॅमरनं या निवृत्त अधिकाऱ्याला ऑनलाइन संपर्क केला. सुरुवातीला त्यानं 'मनी फॉर लाइक'चं आमिष दिलं. एका पोस्टला लाइक करा आणि पैसे मिळवा असं यामागचं गणित होतं. सुरुवातीला निवृत्त अधिकाऱ्याला पैसे मिळालेही. पण तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात स्कॅमरनं आपला रंग दाखवला आणि एकूण २६ ट्रान्जेक्शन करायला लावले. या एकूण ट्रान्जेक्शनमध्ये १.१ कोटी रुपये गमावले आहेत. हे सर्व ट्रान्जेक्शन डझनभर बँक अकाऊंट्समध्ये झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं टेक्स्ट मेसेज करुन वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला. पार्ट-टाइम नोकरी देण्याचं आमिष देत संपर्क साधला गेला होता. संबंधित महिलेनं दावा केला की ती थायलँडची असून यूट्यूब व्हिडिओला लाइकच्या मोबदल्यात ५० रुपये मिळतात. प्रत्येक लाइकचा स्क्रीनशॉट तिनं नाव, पत्ता आणि बँकेचे डिटेल्स मागवले गेले. सुरुवातीला त्यांना १५० रुपयांचा वेलकम बोनस देखील मिळाला. त्यानंतर त्यांना एका फोन मेसेंजर ग्रूपमध्येही जोडण्यात आलं. ज्याचं नाव employee trial group असं होतं. ग्रूपमध्ये अ‍ॅड झाल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासोबत फ्रॉड होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला १ हजार रुपयांचं ट्रान्झॅक्शन करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून तब्बल १.१ कोटी रुपये लाटले गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी