Digital Arrest Crime IIT Delhi Research: तुम्ही दिवसभर कुठे फिरता, कुठे राहता, कोणत्या लोकांना भेटता, तुमचं घर किती मोठं आहे, या सगळ्यांची माहिती दुसऱ्याला सहज मिळू शकते. याच माहितीचा वापर करून तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जाऊ शकते. ही सगळी माहिती दुसऱ्याला कळू शकते जीपीएसच्या माध्यमातून. मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही App डाऊनलोड करता, तेव्हा लोकेशनची परवानगी द्यावी लागते. पण, लोकेशन परवानगी दिल्यावर अॅप फक्त तुमच्या सगळ्या हालचाली नोंदवायला सुरूवात करते, असे आयआयटी दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
आयआयटी दिल्लीतील प्राध्यापक डॉ. स्मृति आर. सारंगी यांनी याबद्दल संशोधन केले आहे. डॉ. सारंगी यांनी जीपीएसच्या गैरवापराबद्दल बोलताना सांगितले की, जीपीएस फक्त तुमचे ठिकाण नाही, तर तुम्ही करत असलेल्या गोष्टींही नोंदवून ठेवत असतो. ज्याचा वापर काही कंपन्या, संस्था चुकीच्या वापरासाठी करू शकतात.
तुम्ही कसे उभे आहात, कोणासोबत आहात; हेही जीपीएसमुळे कळते
जीपीएसमधील सेन्सर यांचाही अंदाज घेतात की तुम्ही कसे उभे आहात, कसे झोपले आहात, कोणत्या भागात आहात. इतकंच नाही, तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात का? व्यवहाराबद्दलही माहिती जीपीएसद्वारे मिळवता येऊ शकते. दररोज तुम्ही कुठे-कुठे जाता याची माहितीही डिजिटल सिग्निचरद्वारे कळते. या सगळ्या गोष्टींबद्दल आयआयटी दिल्लीतमध्ये एक वर्ष संशोधन करण्यात आले.
जीपीएसच्या मदतीने मिळवता येऊ शकते अचूक माहिती
अभ्यास केल्यानंतर आलेल्या निष्कर्षातून अशी माहिती समोर आली की, जीपीएस माणसाबद्दलची माहिती ८७ टक्के अचूक असते.
प्राध्यापक स्मृती सारंगी म्हणाल्या की, "जीपीएस लोकेशन जाणून घेण्यासाठी चार सॅटेलाईटची गरज असते. पण, अनेकदा प्रकाशाच्या हालचाली बदलल्या की, जीपीएस लोकेशनबद्दल चुकीची माहिती दिली जाऊ शकते. त्यासाठी आता १० ते १२ सॅटेलाईटची मदत घेऊन अचूक लोकेशन अॅपला दिली जाते."
"लोकेशनची माहिती देताना २०-३० मिटरचा फरक असू शकतो. ही सगळी माहिती प्रक्रिया करून अॅपला पाठवली जाते. लोकेशनवर सॅटेलाईटचे इलेक्ट्रो मॅग्नेट सिग्नल आदळतात. त्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरीतून अनेक प्रकारची मॅपिंग होऊ शकते. ८० ते ९० टक्के माहिती अचूक दिली जाऊ शकते. यात तुम्ही मोठ्या घरात राहता की छोट्या घरात, तुम्ही रेल्वे स्टेशनवर आहात की, विमानतळावर. तुम्ही किती लोकांसोबत बसलेले आहात. तुम्ही जर मोबाईल घेऊन फिरला, तर तुमच्या घराचे पूर्ण ले आऊटची माहिती मिळू शकते.
हे होऊ द्यायचं नसेल, तर काय कराल?
जीपीएसद्वारे तुमची गोपनिय माहिती कुणाला कळू नये, असे तुम्हाला वाटत असले, तर कोणत्याही अॅपला लोकेशनची परवानगी देताना Only Using the App हाच पर्याय निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल काहीही करत असाल, त्यावेळी दुसरे App सुरू ठेवू नका. बऱ्याचदा तुम्ही काहीतरी अॅपवरून खरेदी करत असता. ते अॅप सुरूच ठेवून तुम्ही दुसरे अॅप ओपन करता.
ज्यावेळी तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी जाता, अशा वेळी मोबाईल बाहेरच ठेवून जा. तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी अॅप ठेवण्याचा प्रयत्न करा. अॅपचा वापर झाल्यानंतर लोकेशन बंद करत चला.
Web Summary : IIT Delhi research reveals GPS tracks your location and activities. Apps can misuse this data, potentially leading to digital arrest by revealing personal habits and routines.
Web Summary : आईआईटी दिल्ली के शोध से पता चला है कि जीपीएस आपके स्थान और गतिविधियों को ट्रैक करता है। ऐप इस डेटा का दुरुपयोग कर सकते हैं, जिससे व्यक्तिगत आदतों और दिनचर्याओं का खुलासा करके डिजिटल गिरफ्तारी हो सकती है।