शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मोबाइलवेडा महाराष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 09:00 IST

मोबाइलच्या स्क्रीनला चिकटलेल्या आपल्या लहानग्यांना त्यातून बाहेर कसे काढायचे, त्यांच्यावर काय निर्बंध आणावेत, याची विवंचना करणारे पालक घरोघरी आहेत...

विनय उपासनीमुख्य उपसंपादक

मोबाइल, स्मार्ट फोन, सोशल मीडिया हे आता घराघरांत परवलीचे शब्द झाले आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत या ना त्या कारणाने मोबाइलचा वापर केला जातो. गंमतीचा भाग म्हणजे त्यापैकी निम्मा वेळ तर उगाचच मोबाइल पाहिला जातो. साहजिकच मोठ्यांचे अनुकरण लहानगे करतात. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपल्याकडे लहान मुलांच्या - म्हणजे ५ ते १२ वयोगटातील - मोबाइल वापरात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. त्यात रील्स, इन्फ्लुएन्सर्सचे युट्यूब चॅनेल्स आणि विविध प्रकारचे गेम्स यांचा अधिक समावेश असतो. आता शाळांमध्येही अनेक ठिकाणी शिक्षणाविषयी वा संबंधित विषयाचे ॲप्स वापरण्यास मुलांना सांगितले जाते.अमेरिकेतील अनेक राज्यांनी मुलांना शाळेत मोबाइल आणण्यास बंदी केली आहे. सुदैवाने आपल्याकडे शाळांमध्ये मुलांना मोबाइल आणायला परवानगीच नाही. मात्र, शाळेतून घरी आल्यावर किंवा शाळेत जाण्याआधी कित्येक तास मुले मोबाइलच्या स्क्रीनला नाक लावून बसले असल्याचे दृश्य घरोघरी असते. कोणीही सुजाण पालक हे अमान्य करणार नाही. मुलांच्या मोबाइल वापरावर निर्बंध या विषयावर दररोज घराघरांतून चर्चावजा वाद होत असतात. मात्र, ते तेवढ्यापुरताच मर्यादित राहून त्यावर ठोस उपाय योजल्याचे कुठेही दिसत नाही. मुलांनाही पालकांच्या या त्राग्याची सवय झालेली असते. तेही मोबाइल वापरावरील पालकांची बोलणी आनंदाने ऐकून घेत दुसऱ्या क्षणाला पुन्हा मोबाइल हातात घेतात. यावर उपाय काय, यासंदर्भात अनेक परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे आयोजित करून झाली आहेत. तरी परिस्थिती ‘जैसे थे’ न राहता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

उपाय काय?

पालकांनी स्वत:च मोबाइल वापरावर निर्बंध लादून घ्यावेत.मुलांना अधिकाधिक मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करावे.मुलांच्या हातात मोबाइल देताना त्यांना वेळेचे बंधन घालावे.आपले मूल मोबाइलवर नेमके काय पाहते, यावर बारिक लक्ष ठेवावे.मोबाइलवर विविध प्रकारच्या भाषा शिकण्याचे, ब्रेनगेम्स खेळण्यास मुलांना उद्युक्त करावे.पॅरेंटिंग कंट्रोल नावाचा एक पर्याय मोबाइलवर उपलब्ध असतो, त्याचा वापर करावा.

मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालण्यात पालक अपयशी ठरत आहेत, हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. यासाठी समाज माध्यमी मंचांनीच ठोस उपाय करावेत. जसे की, मुलांसाठी व्हिडीओ केवायसी सक्तीची करावी, मुलांना मोबाइल पाहताना प्रत्येक ठिकाणी पासवर्डची गरज पडेल, अशी रचना, पालकांच्या डिजिटल परवानगीचा आग्रह इत्यादी. त्यामुळे काही प्रमाणात का होईना मुलांच्या मोबाइल वापरावर निर्बंध येतील. सरकारनेही यासंदर्भात ठोस कायदेकानू करून ते कठोरपणे वापरावेत. अमेरिका आणि चीन या दोन देशांनी तसे कायदे केले आहेत. त्यामुळे मोबाइल वापराच्या प्रमाणात घट नक्की होईल. 

- ॲड. डॉ. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान