खूशखबर! आजपासून स्वस्त होणार मोबाईल आणि LED टीव्ही; सरकारचा नवा नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:46 AM2023-04-01T10:46:10+5:302023-04-01T10:51:16+5:30

मोबाईल आणि टीव्ही आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून खरेदी करणे स्वस्त होऊ शकतं.

mobile tv price cut from 1 april 2023 due to custom duty effect | खूशखबर! आजपासून स्वस्त होणार मोबाईल आणि LED टीव्ही; सरकारचा नवा नियम लागू

खूशखबर! आजपासून स्वस्त होणार मोबाईल आणि LED टीव्ही; सरकारचा नवा नियम लागू

googlenewsNext

मोबाईल आणि टीव्ही आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून खरेदी करणे स्वस्त होऊ शकतं. याचे कारण एक सरकारी नियम आहे, जो आजपासून लागू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही किंवा मोबाईल घेणार असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी असू शकते. 

अर्थसंकल्प 2023-24 मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात केलेल्या इलेक्ट्रिक घटकांवरील सीमाशुल्क 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के कमी करण्याची घोषणा केली होती, जी आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून लागू होत आहे. अशा परिस्थितीत टीव्ही आणि मोबाईलच्या निर्मितीमध्ये कमी खर्च येईल, ज्यामुळे टीव्ही आणि मोबाईलची किंमत कमी होऊ शकते.

ईटीच्या रिपोर्टनुसार, ओपन सेलच्या घटकांवरील सीमाशुल्कात कपात केल्याने टीव्हीच्या किमती सुमारे 5 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. LED बनवण्यात ओपन सेल पॅनेलचा वाटा सुमारे 60-70 टक्के आहे. देशात बनवलेल्या बहुतेक स्मार्ट टीव्हीसाठी, ओपन सेल पॅनेल इतर देशांमधून आयात केले जातात. अशा परिस्थितीत सीमाशुल्कात कपात केल्यामुळे एलईडी टीव्हीची किंमत कमी होईल. 

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, स्थानिक पातळीवर बनवलेले टीव्ही सुमारे तीन हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. टीव्हीशिवाय लिथियम-आयन बॅटरी, कॅमेरा लेन्स यांसारख्या वस्तूंवरही सीमाशुल्क कपात करण्यात आली आहे. अशा स्थितीत या वस्तूंच्या किमतीत घट दिसून येत आहे. सर्व प्रथम, 2019 मध्ये शुल्क रद्द करण्यात आले. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा शुल्क लागू करण्यात आले होते, जे आता 2.5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.

(नोट - टीव्हीच्या किंमती कमी करण्याचा अंतिम निर्णय टीव्ही मॅन्युफॅक्चररचा आहे. त्याला टीव्ही बनवण्यासाठी किती खर्च येतो हे तो फक्त ठरवतो, त्या आधारावर तो टीव्हीची किंमत ठरवतो.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: mobile tv price cut from 1 april 2023 due to custom duty effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.