शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:02 IST

Password Security: पीटीआयच्या अहवालानुसार भारतीयांची पासवर्ड बनवण्याची पद्धतच चुकीची आहे; ती सुधारायची कशी तेही जाणून घ्या!

पासवर्ड शेअर करू नका असे संदेश येऊनही लोक भाबडेपणाने आपल्या अकाऊंटची चावी देऊ करतात आणि मग चोरी झाली म्हणत ओरडतात!' सायबर क्राईमचे वाढते प्रमाण पाहता आपणच सावधगिरी बाळगलेली बरी; नाही का? पासवर्ड सेव्ह करण्याबाबत भारतीय किती निष्काळजी आहेत, हे पीटीआयने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

भारतीय लोक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी वृत्ती स्वीकारतात. लोकांना त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची किंवा नोटपॅडवर लिहून ठेवण्याची सवय असते. अशा निष्काळजीपणामुळे डेटा चोरीचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, १७ टक्के भारतीय नागरिक असुरक्षित पद्धतीने पासवर्ड सेव्ह करतात.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या ताज्या अहवालानुसार, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रत्येक सहावा भारतीय आपले महत्त्वाचे आर्थिक पासवर्ड असुरक्षित पद्धतीने सेव्ह करतो.

एटीएम, डेबिट/क्रेडिट कार्डच्या पासवर्डबाबत लोक बेफिकीरपणे वागत आहेत. सर्वेक्षणात असे समोर आले आहे की सुमारे १७ टक्के लोक एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, बँक खाते आणि ॲप स्टोअरचे महत्त्वाचे पासवर्ड "असुरक्षित" पद्धतीने सेव्ह करतात.

बहुतेक लोक या खात्यांचे पासवर्ड त्यांच्या मोबाईल फोनवरील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जोडून सेव्ह करतात, तर काही लोक असे पासवर्ड नोटपॅडवर सेव्ह करतात. भारतीय नागरिक या प्रकारे पासवर्ड सेव्ह करत असल्याने डेटा चोरीचा धोका वाढतो.

स्थानिक मंडळांनी केलेल्या सर्वेक्षणात ३६७ जिल्ह्यांतील ४८,००० हून अधिक प्रतिसादकर्त्यांनी भाग घेतला. सर्वेक्षणानुसार, ३४ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते त्यांचे पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात.

स्थानिक मंडळांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने उघड केले होते की गेल्या दोन वर्षांत बँक फसवणुकीत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्वेक्षणानुसार, जवळजवळ दोन तृतीयांश लोकांनी सांगितले की ते महत्त्वाचे पासवर्ड त्यांच्याकडे ठेवतात, तर उर्वरित ३४ टक्के लोक म्हणाले की ते त्यांचे पासवर्ड बिनधास्त शेअर करतात.

सर्वेक्षणात असे म्हटले आहे की लोक आपला पासवर्ड आपल्या घरच्यांना, कार्यालयातील कर्मचारी तसेच मित्रांसोबत शेअर करतात. आणि जवळच्या मानल्या जाणाऱ्या याच लोकांकडून सर्वाधिक धोका उद्भवतो. 

म्हणून पासवर्ड सेव्ह करताना पुढील गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा. 

  • पासवर्ड लक्षात राहत नाही म्हणून एकच पासवर्ड सगळीकडे वापरू नका. 
  • सोपा पासवर्ड बनवू नका, जो कोणीही सहज ओळखू शकेल. 
  • जन्म तारीख पासवर्ड म्हणून वापरत असाल तर तेदेखील असुरक्षित ठरू शकते. 
  • वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. 
  • सुरक्षित वहीत पासवर्डची नोंद ठेवा आणि ती वही सुरक्षित जागेवर ठेवा. 
  • मोठे पासवर्ड निवडा. 
  • पासवर्ड तयार करताना सोपे प्रश्न न निवडता कठीण प्रश्न निवडा. ती माहिती कोणाला देऊ नका. 
  • चेहरा, अंगठा स्कॅन करून ते पासवर्ड म्हणून निवडा. असे पासवर्ड सहसा हॅक होत नाहीत. 
टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInternetइंटरनेट