शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Mobile Security: मोबाईल युझर्ससाठी चिंतेची बातमी, जर हे गाणं ऐकलं तर याल अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:15 IST

Mobile Security: अँड्रॉईड स्मार्टफोन युझर्ससाठी आज आलेली ही बातमी चिंता वाढवणारू ठरू शकते. काही रिपोर्ट्सनुसार  अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये युझर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फोनच्या ऑडिओ फॉरमॅटच्या सिक्युरिटीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत.

नवी दिल्ली - अँड्रॉईड स्मार्टफोन युझर्ससाठी आज आलेली ही बातमी चिंता वाढवणारू ठरू शकते. काही रिपोर्ट्सनुसार  अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये युझर्सना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फोनच्या ऑडिओ फॉरमॅटच्या सिक्युरिटीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ६७ टक्के अँड्रॉईड स्मार्टफोन्स सिक्योरिटी अॅटॅकच्या जाळ्यात सापडू शकतात. याबाबती माहिती चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनी दिली आहे.

हा रिपोर्ट वर्षभरासाठीचा आहे. रिसर्चर्सनी सांगितले की, गेल्यावर्षीही याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी एक पॅच जारी करण्यात आला होता. मात्र त्याचा अर्थ धोका टळला आहे, असा होत नाही. अजूनही लाखो स्मार्टफोन्स याच्या सावटाखाली आहे.

रिपोर्टमध्ये अँड्रॉईड फोनच्या त्रुटींचा कुणीही सहजपणे फायदा उठवू शकतो, असेही म्हटले आहे. त्याच्या माध्यमातून कुठलाही स्कॅमर तुमच्या फोनमध्ये गाणं पाठवू शकतो. जर हे गाणे युझरने ऐकले तर हॅकर युझरच्या डिव्हाईसमध्ये मालशिस कोड इंजेक्ट करू शकतो. जर असे झाले तर युझरच्या डिव्हाईसचा अॅक्सेस हॅकरकडे जातो.

चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनी या त्रुटीचा शोध लावला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी अॅपल लॉसलेस ऑडिओ कोडेकचा वापर केला आहे. चेक पॉईंट रिसर्चच्या रिसर्चर्सनुसार, जेव्हा एएलएसी फाइलमध्ये त्रुटींचा वापर करण्यात आला, त्यात दिसून आले की, डिव्हाईसवर रिमोट कोड एक्झिक्युशून अॅटॅक होऊ शकतो. असे केल्याने हॅकर, युझरच्या फोनच्या कॅमेऱ्यापर्यंत अॅक्सेस करू शकतो. तसेच डिव्हाईसला मालवेअरने संक्रमित करू शकतो.  

टॅग्स :MobileमोबाइलInternationalआंतरराष्ट्रीय