शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चार्जिंग करताना मोबाइल हॅक; ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून होतेय फसवणूक; जाणून घ्या काय आहे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 05:33 IST

मोबाइलचे चार्जिंग संपले की, तो रिचार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर केला जातो. बाहेर असलो आणि चार्जर नसला तर चार्जिंग पॉइंट ...

मोबाइलचे चार्जिंग संपले की, तो रिचार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर केला जातो. बाहेर असलो आणि चार्जर नसला तर चार्जिंग पॉइंट शोधून चार्जिंग करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या चार्जिंग पोर्टच्या माध्यमातून मोबाइलमधील महत्त्वाच्या फाइल्स आणि डेटा चोरला जाण्याची शक्यता असते. 

काय आहे मोडस ऑपरेंडी? मोबाइलचे चार्जिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टच्या माध्यमातूनही हॅकिंग केले जाते. या प्रकाराला ज्यूस जॅकिंग असे म्हणतात. सायबर चोरीचाच हा प्रकार आहे. एकदा का मोबाइलमध्ये या मालवेअरने शिरकाव केला की, त्यावर लांबून नियंत्रण ठेवणे चोरांना सोपे जाते. 

कोणत्याही अनोळखी, अज्ञात अशा चार्जिंग पोर्टवर मोबाइल चार्जिंगला लावला की, त्यात दडवून ठेवलेले मालवेअर किंवा स्पाय ॲप्स मोबाइलमध्ये शिरतात. मोबाइलमध्ये सेव्ह केलेला डेटा, पासवर्ड्स, महत्त्वाचे ई-मेल वा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरांच्या हाती सहज लागते. आणि फसवणूक सुरू होते. 

फोन, टॅब, लॅपटॉप या उपकरणांमध्ये ज्यूस जॅकिंग करता येऊ शकते.

काय काळजी घ्यावी?कोणत्याही ठिकाणी मोबाइल चार्जिंग करू नका. शक्यतो बॅटरी बॅकअप स्वत:सोबत घेऊन फिरा.अगदीच अडचण आली तर ओळखीच्या व्यक्तीकडूनच चार्जर घ्या. अनोळखी व्यक्तीची यूएसबी कॉड वापरू नका.अद्याप तरी ज्यूस जॅकिंगमुळे कोणाची फसवणूक झाल्याची तक्रार निदर्शनास आलेली नाही.

टॅग्स :Mobileमोबाइल