शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमधल्या डेटावर डल्ला : ज्युस जॅकिंग म्हणजे काय, कसे वाचावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:59 IST

मोबाइल चार्जिंग हा तर आणखीनच भन्नाट विषय. चार्जिंग फुल्ल असले पाहिजे याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असतो.

मोबाइल आणि मोबाइलमधले नेटवर्क या दोन गोष्टी आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. एक वेळ दोन तास अन्न-पाण्यावाचून राहता येईल, पण मोबाइलमधले नेटवर्क अर्धा तासासाठी जरी गायब झाले तरी जीव कासावीस होतो एकेकाचा. 

मोबाइल चार्जिंग हा तर आणखीनच भन्नाट विषय. चार्जिंग फुल्ल असले पाहिजे याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असतो. मात्र, कधी कधी अशी वेळ येतेच की चार्जिंग कमी झालेले असते आणि नेमकी त्याच वेळी महत्त्वाची, अतिमहत्त्वाची कामे आलेली असतात. सहसा अशी वेळ प्रवासात असताना येते. मग शोधाशोध सुरू होते चार्जिंग पॉइंट्सची. ते मिळाले की हायसे वाटते आणि निर्धास्तपणे मोबाइल चार्जिंगला लावला जातो. इथूनच ज्यूस जॅकिंग सुरू होते...

ज्युस जॅकिंग म्हणजे मोजक्या शब्दात सांगायचे झाल्यास तुमच्या मोबाइलमधल्या डेटावर डल्ला मारणे. विमानतळ, हॉटेल, कॅफेटेरिया आणि इतर सार्वजनिक स्थळांवर आता सर्रास चार्जिंग पॉइंट्स नजरेस पडतात. दिवसभरात अनेक गरजू त्याचा वापरही करतात. हीच बाब हेरून सायबर विश्वातले चाचे या अशा सार्वजनिक चार्जिंग ठिकाणांवर जाळे लावून बसलेले असतात. 

तुम्ही मोबाइल चार्जिंगला लावला की त्यातील डेटा ट्रान्समिट होण्यास सुरुवात होते. सामान्यांच्या नजरेसही येणार नाही, अशा पद्धतीने ही डेटाचोरी सर्रासपणे सुरू असते. त्यात तुमचा वैयक्तिक तपशील, पासवर्ड, बँक खात्याचा तपशील, महत्त्वाचे दस्तऐवज, फोटो, संदेश इत्यादींचा समावेश असतो. हा डेटा चोरून मग त्याची विक्री केली जाते. या डेटाचा वापर कधी, कुठे आणि कसा केला जाईल, याचा काहीही नेम नसतो. डेटा इज न्यू ऑइल, म्हणतात ते काही उगीच नाही.

कोणी शोधला हा शब्द? ज्युस जॅकिंग या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला अमेरिकी पत्रकार ब्रायन क्रेब्स यांनी. शोध पत्रकार असलेल्या क्रेब्स यांनी २०११ मध्ये त्यांच्या लेखात या शब्दाची पेरणी केली. एखाद्या ग्लासमधील ज्युस स्ट्रॉ टाकून जसे प्यायले जाते अगदी तसाच तुमचा डेटा चार्जिंग पॉइंटरला मोबाइल चार्जिंगला लावला की शोषला जातो, असा या शब्दामागचा ढोबळ अर्थ.